शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बोपन्ना - मर्जियाचा सनसनाटी विजय

By admin | Updated: July 9, 2015 01:16 IST

भारताचा दुहेरीतील आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने रुमानियाच्या फ्लोरीन मर्जियाच्या सोबतीने खेळताना विम्बल्डन पुरुष दुहेरी गटात सनसनाटी निकाल

लंडन : भारताचा दुहेरीतील आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने रुमानियाच्या फ्लोरीन मर्जियाच्या सोबतीने खेळताना विम्बल्डन पुरुष दुहेरी गटात सनसनाटी निकाल नोंदवताना संभाव्य विजेत्या व बलाढ्य माइक व बॉब या ब्रायन बंधूना पराभूत करण्याची किमया केली. या धडाकेबाज विजयाच्या जोरावर बोपन्ना - मर्जिया जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करुन प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला.स्पर्धेत नववे मानांकन असलेल्या बोपन्ना - मर्जिया जोडीने तब्बल दोन तास ३४ मिनिटापर्यंत चाललेल्या लढतीत ब्रायन बंधूचा ५-७, ६-४, ७-६, ७-६ असा पराभव केला. बोपन्ना - मर्जिया जोडीने या सामन्यात तब्बल ३१ विजयी फटके मारले. विशेष म्हणजे त्यातील १७ फटके ‘एस’ होते. त्याचवेळी ५ पैकी ३ ब्रेक पॉइंट वाचवताना त्यांनी ब्रायन बंधूला चांगलेच झुंजवले.बोपन्ना - मर्जिया जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या सेटमधील खेळ पाहताना ब्रायन बंधू सहज बाजी मारेल असे दिसत होते. त्यांचे सामन्यावर नियंत्रण देखील चांगलेच बसले होते. मात्र बोपन्ना - मर्जिया यांनी अनपेक्षितरीत्या झुंज देताना ब्रायन बंधूंना संपुर्ण कोर्टवर नाचवले. स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी बोपन्ना - मर्जिया यांना चौथ्या मानांकीत जीन - ज्यूलियन रॉजर व होरीया तेकाऊ या जोडीविरुध्द होईल. या जोडीने सातव्या मानांकीत मार्सिन मेत्कोवस्की - नेनाद जिमोंजिच या जोडीला ६-४, ६-३, ७-६(२) असे नमवले.दुसऱ्या बाजूला मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झा - ब्रुनो सोरेस (ब्राझील) यांनी उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. द्वितीय मानांकीत सानिया - सोरेस जोडीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात क्रोएशियाच्या मारिन डी - अ‍ॅना कोंजुहा जोडीचा ६-३, ७-५, ६-३ असा पराभव केला.