शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार

By admin | Updated: August 31, 2016 04:48 IST

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटाच्या प्ले आॅफ लढतीत बलाढ्य स्पेनविरुद्ध भारताने आपला संघ कायम राखला आहे.

नवी दिल्ली : डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटाच्या प्ले आॅफ लढतीत बलाढ्य स्पेनविरुद्ध भारताने आपला संघ कायम राखला आहे. आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या लढतीसाठी आशिया ओशियाना गट एकमध्ये दक्षिण कोरियाला नमविणाऱ्या भारतीय संघाला कायम ठेवण्यात आल्याने लिएंडर पेस - रोहन बोपन्ना ही जोडी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.भारताने स्पेनविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण लढतीसाठी अनुभवी लिएंडर आणि देशाचा अव्वल दुहेरी खेळाडू बोपन्ना यांची जोडी कायम ठेवली आहे. यंदा पेस-बोपन्ना यांनी पहिल्यांदा कोरियाविरुद्ध चंदिगड येथील ग्रास कोर्ट लढतीत विजय मिळविला होता. विशेष म्हणजे, रिओ आॅलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतरही अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीएफ) ४३ वर्षीय पेस आणि बोपन्ना यांच्यावर आपला भरवसा कायम ठेवला आहे. त्याचवेळी एकेरी लढतीसाठी सकेत मिनैनी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यूएस ओपनमध्ये पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत धडक मारुन लक्षवेधी कामगिरी केलेल्या मिनैनीकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. मंगळवारी एआयटीएच्या एस. पी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या संघाची निवड केली. त्याचप्रमाणे, राखीव खेळाडूंमध्ये प्रजनेश गुणेश्वरम आणि सुमित नागल यांचा समावेश केला आहे. (वृत्तसंस्था)स्पेनविरुद्ध बाजी मारल्यास, पुढील वर्षी होणाऱ्या १६ संघांच्या एलीट विश्व गटात भारताचा प्रवेश होईल.डेव्हिस कप स्पर्धेत भारत - स्पेन चौथ्यांदा एकमेकांसमोर उभे राहतील.त्यात, ५१ वर्षांच्या कालवधीनंतर भारत - स्पेन डेव्हिस कपमध्ये एकमेकांविरुद्ध लढतील.याआधी झालेल्या १९६५ मध्ये बार्सिलोनामध्ये स्पेनने भारताला ३-२ असे नमवले होते.१९२७ मध्ये बार्सिलोनामध्येच भारताने स्पेनला ३-२ असे पराभूत केले होते.तर, १९२२ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये एकमेकांविरुध्द खेळताना स्पेनने ४-१ अशी बाजी मारली होती.घरच्या मैदानावर हार्डकोर्टवर स्पेनला नमविण्याची भारताकडे चांगली संधी.दोन्ही युवा एकेरी खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास आणि पेस-बोपन्ना जोडीने आपला जलवा दाखवल्यास २०११ नंतर पहिल्यांदा भारत विश्व गटात पोहोचेल.