ऑनलाइन लोकमतरिओ, दि. ६ - रिओ ऑलिम्पिकमध्ये सायकल ट्रॅकजवळ मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिओ ऑलिम्पिकमध्ये असलेल्या सायकल ट्रॅकजवळ मोठा स्फोट झाल्याचा आवाज येथील नागरिकांना ऐकू आला. नेमका स्फोट कशाचा झाला याबाबत अद्याप समजले नसून यात कोणीही जखमी झाले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच, याठिकाणी घबराटीचे वातावरण नसल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये सायकल ट्रॅकजवळ स्फोट
By admin | Updated: August 6, 2016 22:43 IST