शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

‘बिनधास्त खेळ’ ही टी-२० ची गरज

By admin | Updated: May 13, 2017 02:04 IST

आयपीएल-१० मधील साखळी सामन्यांचा शेवट होत असताना सामने अत्यंत चुरशीचे ठरताना दिसतात. प्ले आॅफमध्ये पहिल्या दोन स्थानांवर

सुनील गावस्कर लिहितात...आयपीएल-१० मधील साखळी सामन्यांचा शेवट होत असताना सामने अत्यंत चुरशीचे ठरताना दिसतात. प्ले आॅफमध्ये पहिल्या दोन स्थानांवर पोहोचण्यासाठी तसेच पात्रता गाठण्याची संघांची धडपड हृदयाचे ठोके चुकविणाऱ्या रोमहर्षक निकालांतून दिसून येत आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स यांच्या प्ले आॅफच्या आशा आधीच मावळल्या. तरीही त्यांच्यातील चढाओढ एक चेंडू शिल्लक असेपर्यंत गाजली. दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्सने देखील किंग्स इलेव्हन पंजाबच्या धावडोंगरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही सामन्यात किंग्स इलेव्हन संघ भीती घालवून खेळत असल्याने या संघाकडे आजच्या स्थितीत पात्रता गाठण्याची संधी कायम आहे. दिल्लीबाबत असेच घडले. दिल्लीने आधीचे सामने गमविल्याचा फटका त्यांना बसलाच आहे. पण राहिलेल्या सामन्यात खेळताना ‘गमविण्यासारखे काहीच नाही’ या निर्धाराने संघ बिनधास्त खेळ करीत आहे. टी-२० प्रकारात याच निर्धाराची गरज असते.गत चॅम्पियन सनरायजर्सने स्वत:ला सावरले. गुजरात लायन्सविरुद्ध विजय मिळविल्यास प्ले आॅफसाठी पात्रता गाठता येईल, याची संघाला जाणीव आहे. कानपूरच्या ग्रीनपार्कची खेळपट्टी जलद स्वरुपाची आहे. येथे चेंडू झटपट बॅटवर येतो. त्यातच आऊटफिल्ड जलद असल्याने मारलेल्या फटक्यांवर चार धावा मिळण्यास मदत होते. हैदराबाद संघ वॉर्नर आणि धवन यांच्याकडून पुन्हा एकदा झकास सुरुवात मिळावी, अशी आशा बाळगत असावा. पण काढलेल्या धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीतही काळजी घ्यावी लागेल. उपलब्ध पर्यायांचा शिताफीने वापर करण्याची गरज आहे. मोझेस हेन्रिक्स फलंदाजीत तर यशस्वी ठरला पण त्याचा मारा तितकासा प्रभावी दिसत नाही. तो गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी फलंदाज चांगली फटकेबाजी करताना दिसतात.कोलकाता येथे केकेआर आणि मुंबई हे विजयाच्या जिद्दीने खेळताना दिसतील. या लढतीत सुनील नारायणवर मुंबई संघ फलंदाजी-गोलंदाजीत कसा आवर घालतो हे निर्णायक ठरणार आहे. ख्रिस लीनसोबत गौतम गंभीर सलामीला येऊ शकतो. उथप्पा, पांडे आणि युसूफ यांना देखील आपापली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे लागेल. मुंबईने हातातोंडाशी आलेले काही विजय घालविले. त्यामुळेच अखेरची लढत जिंकण्याला महत्त्व असेल. विजयामुळे आत्मविश्वास परत येईलच, शिवाय गुणतालिकेत नंबर वनसह अव्वल स्थानावर देखील कायम राहता येईल. (पीएमजी)