शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

IPL: भुवनेश्वरची पर्पल कॅप जाणार? या खेळाडूकडे सुरेख संधी

By admin | Updated: May 21, 2017 12:48 IST

आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.  रायझिंग पुणे सुपरजायंटस् संघाचा जलदगती गोलंदाज  जयदेव उनादकटकडे या सत्रात सर्वाधिक विकेट घेण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी त्याला आझच्या सामन्यात अचूक आणि सुरेख गोलंदाजी करावी लागले. 
 
सध्या सर्वाधिक विकेट सनराइझर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहेत. 14 सामन्यांमध्ये 26 विकेट घेऊन त्याने पर्पल कॅप आपल्याकडे राखली आहे.  दुसरीकडे उनाडकटने केवळ 11 सामने खेळले आहेत. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली नव्हती. त्याने 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. आजच्या सामन्यात त्याने मुंबईच्या 4 विकेट घेतल्या तर तो भुवनेश्वरची बरोबरी करू शकतो, आणि सरासरीच्या बळावर पर्पल कॅपचा तो मानकरी ठरू शकतो.  
 
हैदराबादचा संघ याआधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे उनाडकटला ही सुरेख संधी आहे. तर अंतिम सामन्यात पोहोचलेल्या मुंबईकडून मिशेल मॅक्लेघन हा 14 सामन्यात 19 विकेट घेऊन तिस-या स्थानावर आहे तर जसप्रित बुमराहने 15 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. 
 
आजचे संघ:
रायझिंग पुणे सुपरजायंट-
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), मनोज तिवारी, रजत भाटिया, लॉकी फग्र्युसन, डॅन ख्रिस्तियन, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, दीपक चहर, राहुल चहर, अ‍ॅडम झम्पा, अंकुश बेन्स, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अशोक दिंडा, मयांक अगरवाल, जसकरण सिंग, ईश्वर पांडे, मिलिंद टंडन.
मुंबई इंडियन्स-
रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमन्स, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, कृणाल पंडय़ा, हार्दिक पंडय़ा, कर्ण शर्मा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, नितीश राणा, जसप्रीत बुमराह, सौरभ तिवारी, आर. विनय कुमार, टिम साऊदी, जीतेश शर्मा, कृष्णप्पा गोथम, श्रेयस गोपाळ, कुलवंत खेजरोलिया.