च्पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय नोंदवणाऱ्या भारतीय संघातील भुवनेश्वर कुमारचा ‘फिटनेस’ हा चिंतेचा विषय बनला आहे; कारण हा गोलंदाज सराव सत्रात नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसलाच नाही. च्त्याला आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वीच घोट्याला दुखापत झाली होती. तो केवळ सिडनी येथे शेवटच्या सामन्यातच खेळला होता. धवल कुलकर्णीला अतिरिक्त खेळाडू ठेवण्यात आले. च्सरावादरम्यान, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी चांगला सराव केला. भुवनेश्वर मात्र चिंतेत दिसत होता. भुवनेश्वरने पहिल्या कॉर्नरवरील नेटवर फलंदाजीचा सराव केला. मुख्य नेटमध्ये मात्र त्याने गोलंदाजी केली नाही. शमी, शर्मा आणि यादव यांना सराव करताना पाहण्याचे काम भुवनेश्वरने केले. त्यावरून असे दिसत होते की, तो गोलंदाजी करणार नाही. धोनी, रायडू आणि आश्विन यांना त्याने गोलंदाजी केली; मात्र, मुख्य नेटवर सराव करण्याचे त्याने टाळले.अश्विनची दुखापत गंभीर नाहीभारताचा अव्वल आॅफस्पिनर आर. अश्विनला रविवारी मेलबोर्न येथे सराव करताना दुखापत झाली होती. पण ही दुखापत गंभीर नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे.
भुवनेश्वरच्या फिटनेसची चिंता
By admin | Updated: February 19, 2015 02:34 IST