शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

भाग्यश्री भंडारीचे विजेतेपद

By admin | Updated: July 26, 2016 01:25 IST

अनुभवी भाग्यश्री भंडारीने अपेक्षित कामगिरी करताना स्पर्धेत चमकदार आगेकूच करणाऱ्या सिध्दि कांगणेला २-० असे रोखून मुंबई जिल्हा पिकलबॉल स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.

मुंबई : अनुभवी भाग्यश्री भंडारीने अपेक्षित कामगिरी करताना स्पर्धेत चमकदार आगेकूच करणाऱ्या सिध्दि कांगणेला २-० असे रोखून मुंबई जिल्हा पिकलबॉल स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. त्याचवेळी अतुल एडवर्ड आणि नताशा बेग बलाढ्य जोडीने मिश्र दुहेरी, तर सचिन मांद्रेकर - सुनिल जोशी यांनी पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर कब्जा केला.आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) मान्यतेने मुंबई उपनगर जिल्हा पिकलबॉल संघटनेच्या वतीने खार जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत चुरशीचे सामने झाले. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतात पिकलबॉलचे सामने वातानुकुलित बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविण्यात आले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिला सेट सहज जिंकल्यानंतर भाग्यश्रीला सिध्दिकडून कडवी झुंज मिळाली. मात्र मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना भाग्यश्रीने ११-९, १२-१० अशी बाजी मारत जेतेपद पटकावले. तर, काव्या प्रभूने कांस्य पदकावर नाव कोरले.मिश्र दुहेरी अंतिम सामना भारताकडून पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवलेल्या अतुल एडवर्डने आपल्या अनुभवाच्या जोरावर गाजवला. त्याने आपली नवखी जोडीदार नताशा बेगसह सुरुवातीपासून शांतपणे खेळ करताना कृष्णा केसरकर - कादंबरी पाटील या युवा जोडीला नमवले. अतुल - नताशा यांनी पहिला सेट एकतर्फी जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कृष्णा - कादंबरी यांनी चांगली टक्कर दिली. मात्र दडपणाखाली झालेल्या चुकांचा फटका बसल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले. अतुल - नताशा यांनी ११-२, ११-५ अशा विजयासह विजेतेपदाला गवसणी घातली. कुणाल बारे - अंकिता बालेकर यांनी कांस्य पटकावलेत्याचवेळी, पुरुष दुहेरी गटात सचिन - सुनिल यांनी अनपेक्षित विजेतेपद पटकावताना आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या मनिष राव आणि भूषण पोतणीस यांना नमवले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पहिला सेट मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर सचिन - सुनिल यांना मनिष - भुषण यांनी चांगलेच झुंजवले. मात्र मिळवलेली पकड अखेरपर्यंत टिकवताना सचिन - सुनिल यांनी ११-४, ११-१३ अशा विजयासह जेतेपद पटकावले. तसेच, रुषभ मेहता - जमशेद बनाजी यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)