नवी दिल्ली : किंग्स इलेव्हन पंजाब संघात समावेश झाल्यानंतर मी चांगली फलंदाजी करू लागलो, अशी कबुली दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलरने येथे दिली. २०१३मध्ये ‘आरसीबी’विरुद्ध ३८ चेंडंूत शतक केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.‘आयपीएल’मध्ये तिसऱ्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात त्याचा समावेश आहे. याचा त्याच्या करियरसाठी किती फायदा झाला, असे विचारले असता तो म्हणाला, ‘माझ्या फलंदाजीत खूपच सुधारणा झाली, मी योग्य गोष्टी करू लागलो. येथे खेळल्यामुळे माझ्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाली. मी अजूनही परिपूर्ण नाही, मात्र दररोज नवीन काहीतरी शिकण्याची प्रक्रिया सुरूच आहे.’ दक्षिण आफ्रिकेकडून ७१ एकदिवसीय व ३१ टी-२० सामने खेळलेल्या मिलरच्या मते पंजाबकडून खेळल्यामुळे फिरकी गोलंदाजांविरुद्धची माझी कामगिरी सुधारली आहे. मागील काही काळापासून मी वेगवेगळ्या परिस्थितीत कसे खेळायचे, हे शिकलो आहे. पंजाबने मागील सत्रातीलच प्रमुख खेळाडूंना कायम ठेवल्याचा नक्कीच फायदा होईल, असेही त्याने म्हटले. आपल्या देशातील सहकारी डिव्हिलर्स व फाफ डुप्लेसिस वेगवेगळ्या संघातून खेळत असले तरी त्यांच्याशी आपली स्पर्धा नसल्याचेही मिलरने स्पष्ट केले.
‘किंग्ज इलेव्हन’मुळे चांगला फलंदाज बनलो -मिलर
By admin | Updated: April 9, 2015 01:13 IST