शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

तरुण खेळाडूंवर विश्वास

By admin | Updated: December 5, 2014 00:56 IST

कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे.

मुंबई : २०१५च्या विश्वचषक स्पर्धेसाठी गुरुवारी निवडण्यात आलेल्या भारताच्या संभाव्य ३० जणांच्या संघात वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, गौतम गंभीर, झहीर खान आणि हरभजनसिंग या सिनीअर खेळांडूना स्थान देण्यात आलेले नाही. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या या संभाव्य संघात तरुण खेळाडूंवरच विश्वास दाखविला आहे. २०११च्या विश्वचषक विजयात सेहवाग, गंभीर व युवराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर या संघात हरभजन आणि झहीर यांचाही समावेश होता. मात्र, गेल्या वर्षभरातील त्यांच्या कामगिरीवर लक्ष टाकल्यास त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसरच होती. विशेषत: हे पाचही जण गेल्या वर्षभरापासून वन डे संघात खेळलेलेच नाहीत. याव्यतिरिक्त जलदगती गोलंदाज आशिष नेहरा व मुनाफ पटेल, फिरकीपटू पियूष चावला आणि अष्टपैलू युसूफ पठाण यांनाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बाहेरच ठेवण्यात धन्यता मानली आहे. २०११च्या विश्वचषक विजेत्या संघापैकी अनेकांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळाला आहे, तर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आहे आणि एस. श्रीसंत याच्यावर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विश्वविजेत्या संघातील महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, विराट कोहली आणि आर. आश्विन यांची अ‍ॅक्शन पुन्हा पाहायला मिळेल. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी ही घोषणा केली. जम्मू - काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल, उत्तर प्रदेशचा फिरकीपटू कुलदीप यादव, महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधव, मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांना स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खेळीमुळे संभाव्य संघात स्थान मिळाले. संभाव्य संघात असलेल्या अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि फॉर्मात असलेला फलंदाज मनोज तिवारीसह यष्टीरक्षक संजू सॅमसन यांची अंतिम १५ जणांमध्ये निवड निश्चित मानली जात आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या अंतिम संघाची निवड करण्यात येणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा आणि अशोक दिंडा यांना आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या बळावर निवडण्यात आले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)