मुंबई : गेल्या वर्षीच्या रणजी मोसमातील निराशाजनक कामगिरी मागे टाकून पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यासाठी 4क् वेळच्या विजेत्या मुंबईचा नव्या दमाचा संघ पूर्णपणो सज्ज झाला आहे. गतस्पर्धेतील अपयशामुळे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची उचलबांगडी झाली व अनुभवी प्रवीण आमरे यांना पुन्हा प्रशिक्षकपदी निवडण्यात आले.
आगामी वल्र्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी नवे पर्याय उपलब्ध व्हावे यासाठी देशांतर्गत स्पर्धेतील बदलानुसार रविवार 7 डिसेंबरपासून प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात होईल. वानखेडे स्टेडियमवर रंगणा:या पहिल्याच सामन्यात यजमान मुंबईसमोर आव्हान असेल ते जम्मू-काश्मीरचे. प्रमुख खेळाडूंची कमतरता व कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव यामुळे यंदाच्या स्पर्धेत मुंबई कितपत मजल मारणार याची साशंकता जरी असली तरी एकूणच मुंबईकरांचा खडूसपणा पाहता कोणताही सामना पालटवण्याची क्षमता या संघाकडे नक्की आहे.
अजिंक्य रहाणो आणि रोहित शर्मा हे ऑस्ट्रेलिया दौ:यावर असल्याने राष्ट्रीय संघात खेळत असून मुख्य गोलंदाज झहीर खान अद्यापही दुखापतीतून पूर्णपणो सावरला नसल्याने मुंबईची धुरा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. रोहित आणि अजिंक्य यांच्या अनुपस्थितीत मुंबईच्या फलंदाजीची जबाबदारी अनुभवी व बुजुर्ग खेळाडू वासिम जाफरकडे असेल. त्याचवेळी यष्टिरक्षक आदित्य तरे, कर्णधार यादव आणि अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर यांची जाफरला चांगली साथ मिळेल. तर गोलंदाजीत मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी आणि अष्टपैलू नायर यांच्याकडे मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी असेल. त्याचप्रमाणो गतस्पर्धेत 39 बळी घेत सर्वाचे लक्ष वेधून घेणा:या विशाल दाभोळकर आणि इक्बाल अब्दुल्ला यांच्याकडे फिरकीची सूत्रे असतील.
दुस:या बाजूला गतस्पर्धेत अनपेक्षित कामगिरीसह क्रिकेट पंडितांना आपली दखल घेण्यास भाग पाडणारा जम्मू-काश्मीर संघ बलाढय़ मुंबईला झुंजवण्यास तयार आहे. जम्मू-काश्मीरचे नेतृत्व अनुभवी परवेझ रसूलकडे सोपविण्यात आले असून स्वत: अष्टपैलू असलेल्या रसूलव्यतिरिक्त समीउल्ल्हा बेग आणि राम दयाल या अन्य अष्टपैलूंच्या कामगिरीवर या संघाचे यश अवलंबून आहे. भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी हे या संघाचे प्रशिक्षक असून त्यांच्या अनुभवाचा फायदा
जम्मू-काश्मीर संघाला होऊ
शकतो. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक नायर (उपकर्णधार), आलम बद्रे, केविन अल्मेडा, विशाल दाभोळकर, अक्षय गिराप, इक्बाल अब्दुल्ला, श्रेयश अय्यर, वासिम जाफर, जावेद खान, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, ब्रेविश शेट्टी, आदित्य तरे (यष्टिरक्षक) आणि शार्दुल ठाकूर.
जम्मू-काश्मीर संघ
परवेझ रसूल (कर्णधार), आदिल रेशी, बंदीप सिंग, समीउल्ल्हा बेग, राम दयाल, मानिक गुप्ता, हरदीप गुप्ता, ओबैद हरुन (यष्टिरक्षक), शुभम खजुरिया, मेहजूर अली, मोहम्मद मुधसीर, पारस शर्मा, आदित्य सिंग, इयान देव सिंग, उमर नाझीर मीर आणि वासीम राझा.