शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयने मनोहर यांचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: April 25, 2017 20:39 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रस्तावित स्वरूपामध्ये अतिरिक्त १० कोटी डॉलर देण्याचा आयसीसीचा प्रस्ताव फेटाळला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. : आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यादरम्यान महसूलवाटपाच्या मुद्यावरील वाद आजही कायम होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रस्तावित स्वरूपामध्ये अतिरिक्त १० कोटी डॉलर देण्याचा आयसीसीचा प्रस्ताव फेटाळला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले, आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी नव्या आर्थिक मॉडेलमध्ये आमच्यापुढे १० कोटी डॉलर अतिरिक्त देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. प्रस्ताव स्वीकारण्यासाठी त्यांनी आम्हाला निर्धारित कालावधी दिला होता, पण आम्ही प्रस्ताव न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.प्रस्ताव का फेटाळला, याबाबत बोलताना अधिकारी म्हणाला,  मनोहर व बीसीसीआय यांना एकमेकांवर विश्वास नाही. हा प्रस्ताव मनोहर यांनी ठेवला आहे. ते चेअरमन आहेत, पण कुणाला काय मिळायला हवे, हे ते ठरवू शकत नाहीत. हे ठरविण्याचा अधिकार सदस्यांना आहे. आम्ही सर्व सदस्य देशांसोबत तोडगा शोधण्यासाठी चर्चा करीत आहोत. बीसीसीआयला काय मिळायला हवे, हे मनोहर ठरवू शकत नाहीत.सध्याच्या महसूलवाटपाच्या पद्धतीत आयसीसीकडून बीसीसीआयला ५७ कोटी ९० लाख डॉलर मिळतात. मनोहर यांचा प्रस्ताव जर आयसीसीने स्वीकारला तर बीसीसीआयचा वाटा २९ कोटी डॉलरचा राहील. त्याला प्रशासकांची समिती मंजुरी देणार नाही. विक्रम लिमये यांनी आयसीसी बोर्डाच्या गेल्या बैठकीमध्ये या मॉडेलचा विरोध केला होता. या मुद्यावर बीसीसीआयचे मत काय आहे, याबाबत बोलताना अधिकारी म्हणाला, जर बीसीसीआयला ५०० रुपये मिळत असतील तर दुसऱ्यांना १०० रुपये मिळत आहेत. आता या सदस्य देशांना २०० रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. मनोहर त्या सदस्य देशांचा वाटा वाढविण्यासाठी बीसीसीआयला मिळणाऱ्या रकमेतील ३०० रुपयांची कपात करण्यास इच्छुक आहेत.  या वादावर तोडगा कसा निघेल, याबाबत बोलताना अधिकारी म्हणाला, आम्ही सदस्य देशांना आश्वासन देत आहोत, की आमचा वाटा ५०० रुपयांचा राहिला तरी आम्ही असे मॉडेल तयार करू, की त्यामुळे त्यांची मिळकत २०० रुपये होईल. आमच्यावर विश्वास ठेवला तर मिळकत वाढविणारे मॉडेल तयार करता येईल.बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. संघ जाहीर करण्याची आज अखेरची तारीख आहे. आयसीसीच्या घटनेनुसार काही परिस्थितीमध्ये देशांना उशिरा संघ जाहीर करण्याची परवानगी देण्यात येते.