शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डीआरएस वादावरून आता बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमनेसामने

By admin | Updated: March 8, 2017 19:00 IST

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमधला डीआरएसवरचा चीटिंगचा वाद चांगलाच चिघळला आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 8 - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमधला डीआरएसवरचा चीटिंगचा वाद चांगलाच चिघळला आहे. या वादावर दोन्ही क्रिकेट टीमचे कॅप्टन आमने-सामने आले आहेत. बुधवारी सर्वात आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं याला सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथला डीआरएस वादावर टीम इंडियानं कोंडीत पकडल्यामुळे त्याच्या बचावासाठी आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढे आली आहे. त्यानंतर बीसीसीआयनंही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड आज उघडपणे स्मिथच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. ते म्हणाले, स्टीव्ह स्मिथ हा गुणवान खेळाडू असून, त्याचं व्यक्तिमत्त्वंही चांगलं आहे. उत्तम खेळ आणि चांगल्या व्यवहारामुळे अनेक लोकांसाठी तो आदर्श आहे. बंगळुरू टेस्टमध्ये रिव्ह्यूच्या वेळी जे काही झालं ते स्टीव्ह स्मिथनं जाणूनबुजून केलं नाही. त्यानंतर त्यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, विराट आणि टीम इंडियाकडून स्मिथवर लावण्यात आलेले आरोप आश्चर्यचकित करणारे आहेत. विराटनं स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाची टीम, ड्रेसिंग रूमवर लावलेल्या आरोपांमुळे त्यांच्याच प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली आहे. सदरलँडसोबत ऑस्ट्रेलियाचे कोच डेरेन लीमेन यांनी विराटच्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्यानंतर बीसीसीआयनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (...म्हणून स्टिव्ह स्मिथवर भडकला विराट कोहली)(भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी वाद)बीसीसीआय म्हणाले, आम्ही व्हिडीओ पाहिला आहे. ज्यात स्टिव्ह स्मिथ जाणूनबुजून ड्रेसिंग रुमकडे इशारा करत सल्ला मागतो आहे. त्यामुळे आम्ही खंबीरपणे कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियासोबत उभे आहोत. विराट कोहली हा एक परिपक्व आणि अनुभवी क्रिकेटर आहे. मैदानावरील त्यांची वागणूक ही दुस-यांसाठी उदाहरण आहे. त्यावेळी विराटच्या प्रतिक्रियेला मैदानावरील पंच निजल लाँग यांनी समर्थन दिलं होतं आणि ते स्मिथला रोखण्यासाठी त्याच्याजवळ गेले होते. बीसीसीआयनं आयसीसीकडेही यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये नेहमीच वाद होत असतात. यापूर्वी 2008च्या सीरिजमध्येही असाच वाद झाला होता.