शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

बांगला देश विजयी

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

बांगला देशचा ऐतिहासिक विजय

बांगला देशचा ऐतिहासिक विजय
वन डे : द. आफ्रिकेला लोळवित २-१ ने मालिका जिंकली
ढाका : सौम्या सरकार (९०) आणि तमीम इक्बाल(नाबाद ६१) यांची शानदार खेेळी तसेच सलामीला केलेल्या १५४ धावांच्या भागीदारीच्या बळावर बांगला देशने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेत बुधवारी द. आफ्रिकेचा नऊ गड्यांनी धुव्वा उडवित २-१ ने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात द. आफ्रिकेच्या डावात षटकांची संख्या कमी झाली. हा सामना ४०-४० षटकांचा खेळविण्यात आला. बांगला देशने द. आफ्रिकेला नऊ बाद १६८ असे रोखले. त्यांनतर डकवर्थ- लुईस नियमानुसार बांगला देशला १७० धावांचे विजयी लक्ष्य देण्यात आले. ते त्यांनी २६.१ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात १७० धावा करीत गाठले.
बांगला देशचा द. आफ्रिकेवर हा एकूण तिसरा आणि सर्वांत मोठा विजय ठरला. बांगला देशने आज सलग चौथी मालिका मायभूमीत जिंकण्याचाही विक्रम नोंदविला. यासोबतच या संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीटही पक्के केले.
सरकार आणि तमीम यांनी सलामीला १४४ चेंडूत १५४ धावांची विजयी भागीदारी केली. सरकारने ७४ चेंडूत १३ चौकार व एका षटकारासह ९० धावा तर तमीमने ७७ चेंडूत सात चौकारांसह नाबाद ६६ धावा ठोकल्या. त्याआधी मधल्या फळीतील फलंदाज जेपी ड्युमिनी (५१) आणि डेव्हिड मिलर (४४) यांनी ६३ धावांची भागीदारी करीत द. आफ्रिकेला ४० षटकांत ९ बाद १६८ पर्यंत मजल गाठून दिली. पाहुण्या संघावर नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय चांगलाच अंगलट आला. त्यांचे १५ षटकांत ५० धावांत आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर २३ षटकांत ४ बाद ७८ अशी स्थिती होती. तोच पावसाचे आगमन झाल्याने दोन तासांचा खेळ वाया गेला. खेळ सुरू झाला तेव्हा षटकांची संख्या ४० करण्यात आली. ड्युमिनी आणि मिलर यांनी सावध खेळून ११३ पर्यंत डाव खेचला. ड्युमिनीने ७० चेंडूचा सामना केला. मिलरने ५१ चेंडू खेळून पाच चौकार मारले. बांगला देशकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. रुबेल हुसेन आणि मुस्तफिजूर रहमान यांनी प्रत्येकी दोन तसेच मुशर्रफ मूर्तझा व महमदुल्लाह यांनी देखील एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)