शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
3
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
4
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
5
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
6
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
7
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
8
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
9
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
10
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
11
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
12
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
13
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
14
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
15
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
16
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
17
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
18
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
19
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
20
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

बांगलादेशला १८२ धावांत गुंडाळले

By admin | Updated: June 6, 2017 05:01 IST

आॅस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत सोमवारी बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवताना त्यांना ४४.३ षटकांत १८२ धावांत गुंडाळले.

लंडन : सलग दुसऱ्या शतकापासून वंचित राहिलेल्या तमीम इकबालच्या झुंजार खेळीनंतरही मिशेल स्टार्कच्या भेदक माऱ्याच्या बळावर आॅस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत सोमवारी बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवताना त्यांना ४४.३ षटकांत १८२ धावांत गुंडाळले.बांगलादेशकडून तमीम इकबाल याने सर्वाधिक ११४ चेंडूंत ६ चौकार, ३ षट्कारांसह ९५ व शाकीब अल हसनने ४८ चेंडूंत २ चौकारांसह २९ धावा केल्या. या दोघांशिवाय मेहदी हसन मिराज (१४) हाच दुहेरी आकडी धावा फटकावू शकला. आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने २९ धावांत ४ गडी बाद केले. अ‍ॅडम झम्पाने २ बळी घेतले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी १६.२ षटकांतच सलामीवीर सौम्या सरकार (३), इमरुल केज (६) आणि मुशफिकर रहीम (९) हे धावफलकावर अवघ्या ५३ धावा असतानाच गमावले. हेजलवूडने सौम्या सरकार याला यष्टिरक्षक वाडेकरवी ३ धावांवर झेलबाद केले, तर इमरुल केजला कमिन्सने व मुशफिकर रहीमला हेनरिक्सने तंबूत धाडले. तथापि, एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या तमीम इकबालला अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १३.३ षटकांत ६९ धावांची भागीदारी करताना बांगलादेशची पडझड थोपवली; परंतु फिरकी गोलंदाज टीम हेडने शकीब अल हसन याला पायचीत करताना आॅस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीस आलेले शब्बीर रहमान (८), महमुदुल्लाह (८) तमीमला साथ देऊ शकले नाहीत. त्यातच मिशेल स्टार्कने त्याच्या वैयक्तिक आठव्या आणि डावाच्या ४३ व्या षटकांत शतकाकडे वाटचाल करणाऱ्या तमीमला पहिल्या, मुशरफे मोर्तजाला तिसऱ्या आणि रुबेल हुसेनला चौथ्या चेंडूंवर बाद करीत बांगलादेशच्या आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या उरल्यासुरल्या आशेला सुरुंग लावला. त्यानंतर पुढच्या षटकांत स्टार्कने मेहदी हसनला बाद करीत बांगलादेशच्या डावाला पूर्णविराम दिला. (वृत्तसंस्था)>पावसाचा व्यत्ययपावसामुळे खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाने १६ षटकांत १ बाद ८३ धावा केल्या होत्या. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाऊ स थांबला नव्हता. त्यामुळे सामन्याचे भवितव्य अधांतरी होते.