शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

By admin | Updated: September 30, 2015 23:31 IST

गेल्या काही कालावधीपासून चढ-उतारांतून जाणारा वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडमध्ये २०१७मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला

दुबई : गेल्या काही कालावधीपासून चढ-उतारांतून जाणारा वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडमध्ये २०१७मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला. या संघाला ३० सप्टेंबर २०१५पर्यंत एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वल आठमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्यामुळे हा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार नाही.१९९८मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर या स्पर्धेत कॅरेबियन देश सहभागी न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे, बांगलादेशाचा संघ या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ते २००६नंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळतील. इंग्लंडमध्ये १ ते १८ जून २०१७ दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी ८ संघ निश्चित झाले आहेत.बांगलादेशाचा संघ याआधी अखेरच्या वेळी भारतातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी पात्रता फेऱ्यादेखील होत होत्या. ते त्या वेळी श्रीलंकेकडून ३७ आणि वेस्ट इंडीजकडून १० गडी राखून पराभूत झाले होते. त्यांनी एकमेव विजय झिम्बाब्वेविरुद्ध १०१ धावांनी मिळविला होता.आयसीसी वन डे वर्ल्डकप २०१५पासून बांगलादेशाचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. त्यांनी पाकिस्तान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. त्यामुळे ते आयसीसी वन डे रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर पोहोचले.चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. त्यासाठी २ गट पाडण्यात आले असून, प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरी गाठतील. गट आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नंतर घोषित करण्यात येईल.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७साठी संघ निश्चित झाले असून, आता पुढील महत्त्वपूर्ण बाब ही क्वालिफिकेशनचे वेळापत्रक व आयसीसी वन डे रँकिंग असेल. त्यात ३० सप्टेंबर २०१७पर्यंत अव्वल ८ संघ आयसीसी वर्ल्डकप २०१९साठी थेट पात्र ठरणार आहेत. त्यानंतर ४ संघांना आयसीसी वर्ल्डकप क्वालिफायर खेळण्याची संधी मिळेल. त्यात आयसीसी क्रिकेट लीग चॅम्पियनशिप आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग डिव्हिजन-२ यांतून पुढे जाणारे संघ सहभागी होतील.(वृत्तसंस्था)------------------------आयसीसी वनडे टीम रँकिंग (३० सप्टेंबर २०१५नुसार) : १. आॅस्ट्रेलिया (१२७ गुण), २. भारत (११५ गुण), ३. दक्षिण आफ्रिका (११० गुण), ४. न्यूझीलंड (१०९ गुण), ५. श्रीलंका (१०३ गुण), ६. इंग्लंड (१०० गुण), ७. बांगलादेश (९६ गुण), ८. पाकिस्तान (९० गुण), ९. वेस्ट इंडीज (८८ गुण), १०. आयर्लंड (४९ गुण), ११. झिम्बाब्वे (४५ गुण) व १२. अफगाणिस्तान (४१ गुण). ------------आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मध्ये जे ८ संघ पात्र ठरले आहेत रँकिंगनुसार आॅस्ट्रेलिया (विद्यमान चॅम्पियन), भारत (१९९८चा विजेता) च्दक्षिण आफ्रिका (२०००चा चॅम्पियन)न्यूझीलंड (२००२चा संयुक्त विजेता)श्रीलंका, यजमान इंग्लंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.