शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

बलजिंदरची विक्रमी फेक

By admin | Updated: June 27, 2015 01:16 IST

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सेनादलाच्या बलजिंदर सिंग याने सर्वांचे लक्ष वेधताना गोळाफेक स्पर्धेत तब्बल ३३

मुंबई : महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सेनादलाच्या बलजिंदर सिंग याने सर्वांचे लक्ष वेधताना गोळाफेक स्पर्धेत तब्बल ३३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना सहज बाजी मारली. त्याचवेळी महिला गटात रायगडच्या मेघा परदेसी हिने गोळाफेक आणि भालाफेक प्रकारात सुवर्ण पटकावताना आपली छाप पाडली.मुंबई उपनगर हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने कांदिवली येथील स्पोटर््स आॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी राज्य विक्रमाची नोंद झाली. बलजिंदर याने १६.२६ मीटरची जबरदस्त फेक करताना सहजपणे बाजी मारली. या वेळी त्यान जिनशा इराणीने नोंदवलेला राज्य विक्रम मोडला. बलजिंदरच्या या धडाक्यापुढे राहुल कृष्णा (ठाणे) आणि गोविंद राय (नाशिक) यांनी अनुक्रमे १३.८६ मीटर आणि १३.४१ मीटरची फेक करून द्वितीय व तृतीय स्थानावर कब्जा केला.महिला गटात पहिल्या दिवशी रायगडच्या मेघाने दोन सुवर्णपदकांची कमाई करून वर्चस्व राखले. सर्वप्रथम तिने गोळाफेक स्पर्धेत ११.६१ मीटरची फेक करून सुवर्ण निश्चित केले. या वेळी दिव्या सोनार (नाशिक) व सारा वोरा (ठाणे) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. यानंतर मेघाने हाच धडाका कायम राखताना भालाफेक स्पर्धेत ४१.९३ मीटरची शानदार फेक करताना मेघाने दुसरे सुवर्ण पटकावले. यामध्ये अप्लेश लांबा आणि अनिता पटेल या दोन्ही मुंबई शहरच्या खेळाडूंना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याचवेळी १०० मीटर स्प्रिंट शर्यतीमध्ये पुरुष गटात ठाण्याच्या गौरांग आंब्रे याने तर महिला गटात पुण्याच्या भाग्यश्री शिर्के यांनी बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)