शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय तालीम संघातून बाळासाहेब लांडगे निलंबित, विश्वस्त मंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 04:36 IST

राष्ट्रीय तालीम संघाची बदनामी केल्याच्या आरोपावरुन कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचे राष्ट्रीय तालीम संघातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय (वरिष्ठ) समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी दिली.

पुणे : राष्ट्रीय तालीम संघाची बदनामी केल्याच्या आरोपावरुन कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचे राष्ट्रीय तालीम संघातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय (वरिष्ठ) समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी दिली.तालीम संघाच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तालीम संघाने लांडगे यांना ३० नोव्हेंबर २०१७रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली होती. त्यात आपण तालीम संघाच्या हिताविरोधात कृत्य करीत असल्याचे, तसेच संघाची बदनामी करणाºया व्यक्तींना पाठबळ देत असल्याचे म्हटले आहे. यावर आपण सात दिवसांत खुलासा न केल्यास आपले सदस्यत्व व प्रतिनिधीत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.लांडगे यांच्याकडून त्याबाबतचा खुलासा न मिळाल्याने विश्वस्त मंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांचे गुलशे तालिमीकडून राष्ट्रीय तालीम संघाकडे आलेले सदस्यत्व व आजीव सभासदत्व निलंबित करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठ समिती नेमण्यात येणार आहे. त्यांचा निर्णय होईपर्यंत राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने राज्य कुस्तीगीर परिषदेतील आपले प्रतिनिधित्व देखील रद्द करण्यात येत आहे. आपणास राष्ट्रीय तालीम संघाच्या कोणत्याही बैठकीत सहभागी होता येणार नाही. तसेच, राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेतही आपल्याला सहभागी होता येणार नसल्याचे तालीम संघाने स्पष्ट केले आहे. संघाचे विश्वस्त अध्यक्ष दामोदर टकले, विश्वस्त नारायण पवार, ज्ञानोबा भिंताडे आणि विश्वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी हा निर्णय घेतला आहे.याबाबत माहिती देताना दोडके म्हणाले, राष्ट्रीय तालीम संघाच्या नावानेच लांडगे गेली ३५ वर्षे राज्य कुस्तीगीर परिषदेवर प्रतिनिधीत्व करीत आहेत. तरीही ते सातत्याने संघाची बदनामी करीत असतात. यापूर्वी त्यांना अनेकदा तोंडी बजावण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी बदनामी करण्याचे सुरुच ठेवल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. लांडगे यांच्या चौकशीसाठी लवकरच उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. जर त्यांनी योग्य खुलासा केल्यास, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. अन्यथा त्यांचे पद कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. याबाबत लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Sportsक्रीडा