नवी दिल्ली : भारताचा अंगदवीर सिंग बाजवा याने अमेरिकेच्या हेली डून याच्या जोडीने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.ही स्पर्धा वेगळ्या प्रकारची होती तसेच ती प्रथमच घेण्यात आली. या प्रकारात दोन वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना जोडी बनवण्याची संधी मिळाली. मात्र ही स्पर्धा फक्त चाचणीसाठी असल्यामुळे तिला अधिकृत विश्वचषक स्पर्धेचा दर्जा देण्यात आला नाही. हेडन स्टीवर्ट व तीन वेळेचा आॅलिम्पिक पदकविजेता नेमबाज किम्बर्ले रोडे यांनी अर्जेंटिनाच्या फेडरिको व मोलिसा गिल यांना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. बाजवा आणि डून यांनी रॉबर्ट जॉन्सन व कॅटलिन कोनोर जोडीला २८-२६ असे पराभूत केले. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकासह पाच पदके पटकावली आहेत. (वृत्तसंस्था)
बाजवा - डून जोडीला कांस्य
By admin | Updated: March 4, 2017 05:08 IST