शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बजरंगने दिली पत्नी संगीताला प्रेरणा, ऑलिम्पिकमधील यशाने केले प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 10:28 IST

सोनिपत येथे निवासस्थानी असलेल्या संगीताने म्हटले की, ‘यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.’ संगीताला गुढघ्याची दुखापत झाली होती आणि त्यातून ती आता सावरली आहे.

मनोज जोशी -

नवी दिल्ली : साधारणपणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे योगदान असे असते, असे म्हटले जाते. मात्र, टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल बजरंग पुनिया याच्या बाबतीत मात्र असे म्हणावे लागणार नाही. कारण, त्याने आपली पत्नी संगीता हिला प्रेरित केले असून, आता संगीताही बजरंगपासून प्रेरणा घेत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांसाठी तयारी करण्याचा विचार करत आहे. बजरंगच्याच दर्जाची मल्ल बनण्याचे लक्ष्य संगीताने निर्धारित केले आहे.

सोनिपत येथे निवासस्थानी असलेल्या संगीताने म्हटले की, ‘यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.’ संगीताला गुढघ्याची दुखापत झाली होती आणि त्यातून ती आता सावरली आहे. शस्त्रक्रियेमुळे तिला अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली होती. संगीताने सांगितले की, ‘जर दोघांचे लक्ष्य देशासाठी पदक जिंकण्याचे असेल, तर त्याचे निकालही चांगलेच येतील.  आता मी पुन्हा कुस्ती खेळण्यास सुरुवात केली आहे.’ संगीताने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले असून, आशियाई कॅडेट आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकही जिंकले आहे.

बजरंगने आपल्या ऑलिम्पिक कामगिरीविषयी सांगितले की, ‘ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद आहेच, पण देशवासियांच्या अपेक्षेनुसार सुवर्ण मिळवण्यात अपयश आल्याची खंत अजूनही आहे. पण आता देशवासीयांना विश्वास देतो की, पॅरिसमध्ये पदकाचा रंग नक्कीच बदलेल.’

डॉक्टरांचा सल्ला ठरणार महत्त्वाचाबजरंग म्हणाला, ‘डॉक्टरांशी चर्चा करुनच मी पुढील निर्णय घेईन. माझी दुखापत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले, तर आगामी जागतिक स्पर्धेऐवजी पुढील वर्षी आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकुल स्पर्धेवर माझे लक्ष असेल.’

सरावासाठी चांगल्या साथीदाराची गरजभारतात ६५ किलो वजनी गटात फारसे मल्ल नाहीत. याबाबत बजरंग म्हणाला की, ‘सरावात चांगला साथीदार असेल, तर तयारी चांगली होते. ज्या ताकदीने सराव केला जातो, त्याची कमतरता मला प्रत्यक्षात राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेत भासते. ऑलिम्पिकआधी रशियात केलेली तयारी जागतिक दर्जाची होती. ज्या अकादमीमध्ये मी सराव करत होतो, तिथेच रशियाचा २०१६ सालचा चॅम्पियन सोसलान आणि ७४ किलो गटाचा ऑलिम्पिक विजेता घडला. जर मी सुवर्ण जिंकले असते, तर माझाही फोटो त्या अकादमीमध्ये लावण्यात आला असता.’ 

टॅग्स :Wrestlingकुस्तीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Japanजपान