शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

विश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय आव्हानाचे नेतृत्व बजरंगकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:53 IST

बुडापेस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनिया हा शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद ...

बुडापेस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनिया हा शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ३० सदस्यीय भारतीय आव्हानाचे नेतृत्व करेल.स्पर्धेत पुनिया स्वत: ६६ किलो वजन गटात जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. २०१३ च्या विश्व स्पर्धेत त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले होते. मागच्या महिन्यात खेलरत्न पुरस्कारातून वगळण्यात आल्यानंतरही बजरंगने नाराजी टाळून कठोर सराव केला. आता २०१३ च्या स्पर्धेतील पदकाचा रंग बदलण्याची त्याच्याकडे संधी असेल. राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेत त्याने ज्या सहजतेने सुवर्ण पदके जिंकली तो अनुभव बघता त्याला येथे पदक मिळेल, असे मानले जात आहे. येथे रँकिंग मिळविणारा तो एकमेव भारतीय मल्ल असून रविवारी त्याची लढत होईल. ६५ किलो गटात २०१८ च्या युरोपियन चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता इलिया बेकबुलातोव याने माघार घेतली आहे.अव्वल मानांकित तुर्कस्तानचा सेलाहट्टीन किलिचसालायान याच्या कामगिरीकडे देखील अनेकांच्या नजरा आहेत. महिला गटात स्टार मल्ल विनेश फोगाट (५० किलो) पदकाची प्रबळ दावेदार आहे. भारताने आतापर्यत विश्व चॅम्पियनशिपमध्ये केवळ सहा पदके जिंकली असून सुशील कुमार हा एकमेव सुवर्ण विजेता भारतीय मल्ल आहे. (वृत्तसंस्था)भारतीय कुस्ती संघपुरुष फ्रीस्टाईल : संदीप तोमर (५७ किलो); सोनबा (६१ किलो); बजरंग पूनिया (६५ किलो); पंकज राणा (७० किलो); जितेंद्र (७५ किलो); सचिन राठी (७९ किलो); पवन (८६ किलो); दीपक राणा (९२ किलो); मोसम खत्री (९७ किलो); सुमित (१२५ किलो).महिला फ्रीस्टाईल : विनेश फोगाट (५० किलो); पिंकी (५३ किलो); सीमा (५५ किलो); पूजा ढांडा (५७ किलो); संगीता (५९ किलो); साक्षी मलिक (६२ किलो); रितू (६५किलो); नवज्योत कौर (६८ किलो); रजनी (७२ किलो); किरण (७६ किलो).पुरुष ग्रीको रोमन : विजय (५५ किलो); ज्ञानेंद्र (६० किलो); गौरव शर्मा (६३ किलो); मनीष (६७ किलो); कुलदीप मलिक (७२ किलो); गुरप्रीत ंिसंग (७७ किलो); मंजीत (८२ किलो); हरप्रीत (८७ किलो); हरदीप (९७ किलो); नवीन (१३० किलो).