शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन : सिंधूची फायनलमध्ये धडक, उद्या होणार अंतिम सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 19:15 IST

उपांत्य फेरीत सिंधूने तिसऱ्या मानांकित चीनच्या चेन युफेनवर २१-१९, २१-१० अशी मात केली.

मुंबई : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूने तिसऱ्या मानांकित चीनच्या चेन युफेनवर २१-१९, २१-१० अशी मात केली. या विजयासह सिंधू अंतिम फेरीत पोहोचली आहे. पहिल्या गेममध्ये सिंधू आणि चेन युफेन यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये फक्त दोन गुणांच्या फरकाने सिंधू जिंकली. पहिला गेम जिंकल्यावर मात्र सिंधूचा आत्मविश्वास दुणावला. सिंधूने दुसऱ्या गेममध्ये चेन युफेनवर सहज मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

सिंधूने डेन्मार्कच्या मिया बिलिचफेल्टविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत सरशी साधत गुरुवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. पाचव्या मानांकित सिंधूने दुसºया फेरीच्या लढतीत एक तास दोन मिनिटामध्ये बिलिचफेल्टविरुद्ध २१-१४, १७-२१, २१-११ ने सरशी साधली. सिंधूचा जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या बिलिचफेल्टविरुद्ध यंदाचा तिसरा विजय आहे. यापूर्वी तिने डेन्मार्कच्या या खेळाडूचा इंडियन ओपन व सिंगापूर ओपनमध्ये पराभव केला होता. सिंधूची यानंतरची लढत मलेशियाच्या सोनिया चेह व जपानच्या नाओमी ओकुहारा यांच्यादरम्यानच्या लढतीत विजेत्या खेळाडूसोबत होईल. सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही आणि बिलिचफेल्टने ६-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडूने पुनरागमन करताना बरोबरी साधली. सिंधूने कामगिरीत सातत्य राखत पहिला गेम जिंकला. दुसºया गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ अनुभवायला मिळाला. बिलिचफेल्टने दमदार पुनरागमन केले. तिने सुरुवातीला ९-५ आणि त्यानंतर १०-७ ने आघाडी घेतली. सिंधूने त्यानंतर सलग ३ गुण वसूल करीत १०-१० अशी बरोबरी साधली. डेन्मार्कच्या खेळाडूने सिंधूच्या चुकांचा लाभ घेतला आणि दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मात्र सिंधूने वर्चस्व गाजवले व सहज सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, सात्विकासाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीला दुसºया फेरीत इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस फर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजय सुकामुल्जो यांच्याविरुद्ध १५-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton