शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
3
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
4
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
5
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
6
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
7
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
8
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
9
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
10
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
11
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
12
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
13
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
14
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
15
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
16
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
17
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
18
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
19
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
20
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

टी-२०चा खेळावर वाईट परिणाम

By admin | Published: August 25, 2016 4:37 AM

सध्या जगभरात विविध ठिकाणी टी२० क्रिकेटचा धडाका सुरु आहे.

चंदिगड : सध्या जगभरात विविध ठिकाणी टी२० क्रिकेटचा धडाका सुरु आहे. क्रिकेटच्या या वेगवान प्रारुपमधून क्रिकेटपटूंना लाखो-करोडो रुपयांची कमाई मिळत आहे. परंतु, यामुळे खेळावर वाईट परिणाम पडत आहे, असे स्पष्ट मत आॅस्टे्रलियाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनी सांगितले.पीसीए स्टेडियममध्ये २३ वर्षांखालील वेगवान गोलंदाजांच्या प्रशिक्षक केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या मॅकग्रा यांनी यावेळी आपले मत मांडले. ‘‘सध्या क्रिकेटपटू सातत्याने टी२० लीगकडे आकर्षित होत असून, यामुळे त्यांच्या खेळावर विपरीत परिणाम पडला आहे. ही परिस्थिती केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपुर्ण जगामध्ये पाहायला मिळत आहे,’’ असे मॅकग्रा म्हणाले.मॅकग्रा यांनी सांगितले, ‘‘भारतात सर्वात लोकप्रिय व यशस्वी आयपीएल होते. आॅस्टे्रलियामध्ये बिग बॅश लीग होते. तसेचे जगात इतर ठिकाणीही विविध टी२० लीग होतात. क्रिकेटपटूंना जेव्हा या स्पर्धांमध्ये यश मिळते, तेव्हा ते इतकी मेहनत घेत नाही, जेवढी या खेळासाठी आवश्यक असते.’’ ‘‘खेळाडूंसाठी प्राथमिक बाब म्हणून पैसा कधीच नसावा. त्यांना खेळासाठी चांगला पैसा मिळतो याचा मला आनंद आहे. मात्र, युवा खेळाडू व खासकरुन वेगवान गोलंदाजांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.,’’ असेही मॅकग्रा यांनी सांगितले. वेगवान गोलंदाजांबाबत मॅकग्रा म्हणाले की, ‘‘चांगला वेगवान गोलंदाज बनण्यासाठी खेळाडूला प्रत्येक परिस्थितीमध्ये खेळण्याची तयारी ठेवावी लागते. युवा खेळाडूंनी स्वत:हून ठरवावे की आपल्याला कोणत्या स्तराचा खेळाडू बनायचे आहे. त्यानुसारच त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.’’ (वृत्तसंस्था)>येणाऱ्या काळात युवा चमकतीलभारतामध्ये युवा गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही. काही खेळाडू असे आहेत, जे येणाऱ्या काळामध्ये जगासमोर आपली प्रतिभा दाखवतील. माझ्यामते सध्या वीर प्रताप सिंग एक शानादार युवा गोलंदाज असून त्याचे प्रदर्शन असामान्य आहे. त्याच्याशिवाय, अंकित चौधरी, अंकित राजपूत आणि नाथु सिंग यांच्यासारखेही चांगले खेळाडू आहेत, जे पुढे आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करतील.- ग्लेन मॅकग्रा