शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

जयवर्धने, आमलाकडे पाठ

By admin | Updated: February 17, 2015 00:42 IST

यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १० कोटी ५० लाख रुपयांत, तर दिल्ली डेअर डेव्हिल्सने श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्युजला सात कोटी रुपयांत खरेदी केले.

आयपीएल लिलाव : सिंधुदुर्गचा निखिल नाईक पंजाब संघातबंगळुरू : स्पॉट फिक्सींग आणि सट्टेबाजी यामुळे बदनाम झालेल्या आयपीएल-८च्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलावात युवराजसिंग नंतर यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १० कोटी ५० लाख रुपयांत, तर दिल्ली डेअर डेव्हिल्सने श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्युजला सात कोटी रुपयांत खरेदी केले. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्टला सनरायझर्स हैदराबादने ३ कोटी ८० लाखांत, भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा याला दिल्लीने ३ कोटी ५० लाखांत, आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचला मुंबई इंडियन्सने ३ कोटी २० लाखांत खरेदी केले. श्रीलंकेचा माहेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर यांना कोणत्याही संघाने घेणे टाळले. दिल्लीकडे इतर संघांच्या तुलनेत सर्वाधिक ३९.७५ कोटी रुपये होते. बंगळुरूने कार्तिकला गतवर्षीच्या तुलनेत पाच कोटी कमी रक्कम देऊन खरेदी केले, तर सनरायझर्सने केवीन पीटरसनला दोन कोटींमध्ये विकत घेतले. गतवर्षी त्याला नऊ कोटी रुपये मिळाले होते. भारताचा सलामीवीर मुरली विजय याच्यासाठी पंजाबने ३ कोटी मोजले, इंग्लंडचा वन डे कर्णधार इयान मॉर्गनसाठी हैदराबादने दीड कोटी मोजले, तर न्यूझीलंडच्या केन विलियम्सनसाठी हैदराबाने ६० लाखच मोजणे पसंत केले.(वृत्तसंस्था)खरेदी केलेले काही खेळाडूमुरली विजय- किंग्ज इलेव्हन पंजाब (३ कोटी), अँजेलो मॅथ्युज - दिल्ली डेअर डेव्हिल्स (७.५ कोटी), केन विलियम्सन - सनरायझर्स हैदराबाद (६० लाख), युवराज सिंग - दिल्ली (१६ कोटी), केवीन पीटरसन - हैदराबाद (२ कोटी), दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१०.५ कोटी), अमित मिश्रा - दिल्ली (३.५ कोटी), अ‍ॅरॉन फिंच - मुंबई इंडियन्स (३.२ कोटी), इयान मॉर्गन - हैदराबाद (१.५ कोटी), एस. बद्रिनाथ - बंगळुरू (३० लाख), मायकल हस्सी - चेन्नई सुपर किंग्ज (१.५ कोटी), जेम्स निशाम - कोलकाता नाईट रायडर्स (५० लाख), रवी बोपारा - हैदराबाद (१ कोटी), क्रिस मोरिस - राजस्थान रॉयल्स (१.४ कोटी), डॅरेन सॅमी - बंगळुरू (२.८ कोटी), लक्ष्मीरतन शुक्ला - हैदराबाद (३० लाख), प्रवीणकुमार - हैदराबाद (२.२ कोटी), ट्रेंट बोल्ट - हैदराबाद (३.८ कोटी), जयदेव उनाडकट - दिल्ली (१.१ कोटी), सीन अ‍ॅबोट - बंगळुरू (१ कोटी), अ‍ॅडम मिल्ने - बंगळुरू (७० लाख), प्रग्यान ओझा - मुंबई (५० लाख), ब्रॅड हॉज - कोलकाता (५० लाख), डेव्हिड वाएस - बंगळुरू (२.८ कोटी), मिचल मॅक्लेनहॅन - मुंबई (३० लाख), गुरिंदर संधू - दिल्ली (१.७ कोटी), श्रेयस अय्यर - दिल्ली (२.६ कोटी), सर्फराज खान - बंगळुरू (५० लाख), निखिल नाईक - पंजाब (३० लाख), आदित्य गरहवाल - कोलकाता (२५ लाख), डोमनिक जोसेफ - दिल्ली (७५ लाख), केसी चारिअप्पा - कोलकाता (२.४ कोटी), शेल्डन जॅक्सन - कोलकाता (१५ लाख), ट्रावीस हेड - दिल्ली (३० लाख), इरफान पठाण - चेन्नई (१.५ कोटी), अ‍ॅल्बी मॉर्केल - दिल्ली (३० लाख), सिद्धेश लाड - मुंबई (१० लाख), जे. सुचिथ - मुंबई (१० लाख), झहीर खान - दिल्ली (४ कोटी), अभिमन्यू मिथून - मुंबई (३० लाख), अ‍ॅडन ब्लिझार्ड - मुंबई - ३० लाख.