शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आॅस्ट्रेलियाचा आफ्रिकेवर थरारक विजय

By admin | Updated: November 9, 2014 23:31 IST

आॅस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दोन गडी राखून थरारक विजय मिळविला़

सिडनी : जेम्स फॉल्कनरची (३ बळी) सुरेख गोलंदाजी आणि कॅमेरून व्हाईटची (३१ चेंडूंत नाबाद ४१) आक्रमक खेळी या बळावर आॅस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दोन गडी राखून थरारक विजय मिळविला़ या विजयासह आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बाजी मारली़दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉक (४८) आणि रिजा डेंड्रिक्स (४९) यांच्या आक्रमक खेळाचा लाभ घेता आला नाही आणि हा संघ निर्धारित षटकांत ६ बाद १४५ धावाच करू शकला़ अन्य फलंदाजांमध्ये आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरलाच नाबाद ३४ धावा करता आल्या़ इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले़ आॅस्ट्रेलियाकडून जेम्स फॉल्कनर याने २८ धावांत तीन गडी बाद केले़ त्याला साथ देत डी़ बोलिंगर, कॅमेरून बोयसे आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला़ दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची स्थिती एकवेळ ४ बाद ६२ अशी झाली होती़; मात्र व्हाईट याने संघाला संकटातून बाहेर काढताना ३१ चेंडूंत चार चौकार आणि एका षट्कारासह आक्रमक ४१ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला़ आॅस्ट्रेलियाकडून व्हाईट व्यतिरिक्त कर्णधार अ‍ॅरोन फिंच याने ३३, तर ग्लेन मॅक्सवेल २३ आणि बेन डंक याने १४ धावांचे योगदान दिले़ फिंच आणि डंक यांनी पहिल्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी रचली होती़ यानंतर निक मॅडिन्सन (४) आणि शेन वॉटसन (५) यांना मोठी खेळी करता आली नाही़ (वृत्तसंस्था) त्यामुळे संघ ४ बाद ६२ असा अडचणीत सापडला होता़ दक्षिण आफ्रिकेकडून रॉबिन पीटरसन आणि डेव्हिड वाईसे यांनी सुरेख गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन गडी बाद केले,तर के़ एबोट आणि मर्चंट डी. लांगे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला़ दरम्यान, सामनावीर पुरस्काराचा मानकरी कॅमेरून व्हाईट ठरला, तर जेम्स फॉल्कनर मालिकावीर ठरला़ (वृत्तसंस्था)