शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

By admin | Updated: July 19, 2015 00:41 IST

ख्रिस रॉजर्स ( खेळत आहे ४४) आणि डेव्हिड वॉर्नर (खेळत ६०) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या अ‍ॅशेज क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी

लंडन : ख्रिस रॉजर्स ( खेळत आहे ४४) आणि डेव्हिड वॉर्नर (खेळत ६०) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या अ‍ॅशेज क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात बिनबाद १०८ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंड संघाचा पहिला डाव ३१२ धावांवर संपुष्टात आला होता. आॅस्ट्रेलियाकडे ३६२ धावांची आघाडी असून त्यांचा एकही फलंदाज बाद झालेला नाही. तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार अलेस्टर कुक व बेन स्टोक्स यांनी ४ बाद ८५ धावांवरून आपल्या डावाचा खेळ सुरू केल्यानंतर कुक आणि स्टोक्सने दमदार फलंदाजी केली. अ‍ॅलेस्टर कुकने १३ चौकारांसह ९६ धावांची झुंजार खेळी हे वैशिष्ट्य ठरले. त्याला स्टोक्सने १३ चौकार व १ षटकारासह ८७ धावांची खेळी करून चांगली साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीमुळे इंग्लंड संघ आपल्या पहिल्या डावात ३०० धावांचा पल्ला गाठू शकला. अ‍ॅलेस्टर कुक व स्टोक्स बाद झाल्यानंतर बटलरला १३ धावांवर लियोनने बाद केले. त्यानंतर मोईन अलीने ५ चौकार व एक षटकाराच्या साहाय्याने ५७ चेंडूंत ३९ धावांची खेळी केली. स्टुअर्ट ब्रॉडने २१ धावा इंग्लंडचा पहिला डाव ३१२ धावांत संपुष्टात आला. इंग्लंड संघाचे ५ फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. आॅस्ट्रेलियाकडून हेजल वूडने ६८ धावांत ३ जॉन्सने ५३ धावांत ३, तर मार्शने २३ धावांत २ गडी बाद केले.आॅस्ट्रेलियाच्या रॉजर्स आणि वॉर्नरने दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात केली. रॉजरने ७२ चेंडूंत ५ चौकारांच्या साहाय्याने ४४, तर वॉर्नरने १० चौकारांच्या साहाय्याने ६० धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया पहिला डाव ८ बाद ५६६ (घोषित). इंग्लंड : पहिला डाव सर्वबाद ३१२. (अ‍ॅलेस्टर कुक ९६, जी. बॅलन्स २३, बेन स्टोक्स ८७, मोईन अली ३९, स्टुअर्ट ब्रॉड २१, हेजलवूड ३/६८, मिशेल जॉन्सन ३/५३, मिशेल मार्श २/२३, स्टार्क १/८६, लियोन १/५३). आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : बिनबाद १०८ (ख्रिस रॉजर्स खेळत आहे ४४, डेव्हिड वॉर्नर खेळत ६०