शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावात आटोपला

By admin | Updated: March 25, 2017 19:31 IST

पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले.

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 25 - पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. अन्य गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावल्याने  भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात आला. 
 
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने (111) कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवत शतक झळकावले. त्याची आणि मॅथ्यू वेडची (57) अर्धशतकी खेळी वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. डेव्हीड वॉर्नर, मॅक्सवेल, हँडस्काँब, कमिन्सचे महत्त्वाचे विकेट यादवला मिळाले. उमेश यादव दोन तर, अश्विन, जाडेजा, भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक विकेट घेतला. 
 
ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. रेनशॉच्या रुपाने 10 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लवकर बसला. अवघ्या 1 धावावर उमेश यादवच्या रेनशॉच्या यष्टया वाकवल्या. पण त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (56) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी134 धावांची भागीदारी केली.
 
हे दोघे फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. पण स्मिथ आणि वॉर्नरची जमलेली जोडी कसोटी पदार्पण करणा-या कुलदीप यादवने फोडली. त्याने वॉर्नरला (56) धावांवर कर्णधार रहाणेकडे झले द्यायला भाग पाडले. वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली. मार्श (4), हँडस्काँब (8)आणि मॅक्सवेल (8) स्वस्तात माघारी परतले. कर्णधार स्मिथने एकबाजू लावून धरली मात्र तो 111 धावांवर आऊट झाला. 
 
चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणा-या निर्णायक कसोटी सामन्याआधीच विराट कोहली खेळणार नसल्याने भारताला खूप मोठा धक्का बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आराम देण्यात आला आहे. विराट कोहली खेळणार नसल्याने उप कर्णधार अजिंक्य रहाणेकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान विराट कोहलीऐवजी भारतीय संघात गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. या सामन्यातून कुलदीप यादव पदार्पण केले. 
 
मैदानी आणि शाब्दिक चकमकीने गाजलेली ही मालिका अद्याप १-१ अशी बरोबरीत असली तरी मालिका जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आसुसला आहे. कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने जिंकण्याचे दडपण पाहुण्यांच्या तुलनेत यजमानांवर अधिक जाणवणार आहे.
 
सामन्याच्या पूर्वसंध्येलाच कोहलीने आपण चौथा कसोटी सामना खेळणार नसल्याचे संकेत दिले होते. कोहलीने नेटवर सराव केला पण फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हेच माझ्या खेळण्याचा निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले होते. तथापि सामन्याआधी प्रतिस्पर्धी संघाला मानसिक बळ मिळू नये यासाठी विराट पत्रकारांपुढे देखील हजार झाला होता. नेटस्वर कसे वाटत होते असा सवाल करताना कोहली म्हणाला, ‘मुव्हमेंट वाढली की थोडे दुखणे उमळते. आज सायंकाळी किंवा उद्या सामन्याआधी निर्णय होईल. जोखीम पत्करणे धोकादायक ठरेल काय याचे उत्तर फिजिओ देतील. फिटनेसमध्ये पास झालो तर खेळेन’ असं विराट बोलला होता. 
 
तिसरा सामना अनिर्णीत राखल्याने स्टीव्ह स्मिथ आणि सहकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे भारतही कसलीही कसर शिल्लक न राखता विजयाच्या इराद्यानेच उतरणार आहे.
 
लोकेश राहुलकडून चांगली सुरुवात अपेक्षित असून दोन महिन्यांआधी तिहेरी शतक ठोकणाऱ्या करुण नायरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांच्याकडून शांतचित्त आणि कौशल्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित असेल. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेचे नेतृत्व पणाला लागलेले असेल. ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत राखला तरी त्यांचा नैतिक विजय होईल. सामना जिंकलाच तर त्यांच्यासाठी अ‍ॅशेसपेक्षा हा मोठा विजय ठरणार आहे.
 
हा संघ भारतात दाखल झाला तेव्हा आतापर्यंतचा सर्वांत कमकुवत संघ अशी गणना करण्यात आली. पण पहिलाच सामना जिंकल्याने चित्र बदलले.