ऑनलाइन लोकमत
नॉटिंगहॅम (इंग्लंड), दि. ६ - अवघ्या १५ धावांमध्ये ८ गडी बाद करणा-या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले आणि चौथी कसोटी जिंकण्याच्या कागारूंच्या इराद्यांना पहिल्याच दिवशी सुरूंग लावला आहे. कांगारूंचा पहिला डाव इंग्लंडने ६० धावांमध्ये गुंडाळला असून हा सामना वाचवण्यासाठी आता त्यांना आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत.
पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेमध्ये २ -१ अशी आघाडी इंग्लंडने घेतली असून हा सामना जिंकत मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न इंग्लंड करणार हे उघड आहे तर सामना किमान अनिर्णित राखून मालिका अनिर्णित राखण्याचा प्रयत्न कांगारू करतिल अशी शक्यता आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक अशा १४ धावा लागल्या अतिरीक्त या सदरात, तर मिशेल जॉन्सनने १३ व मायकेल क्लार्कने १० धावा करत दोन आकडी टप्पा गाठला. बाकी सगळे फलंदाज प्रत्येकी १० धावादेखील करू शकले नाहीत.