शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

आॅस्ट्रेलियाचा मालिका विजय

By admin | Updated: December 30, 2015 03:13 IST

आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १७७ धावांनी पराभव केला आणि फ्रँक वॉरेल चषकावर नाव कोरले. आॅस्ट्रेलिायने होबार्टमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव २१२ धावांनी

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात १७७ धावांनी पराभव केला आणि फ्रँक वॉरेल चषकावर नाव कोरले. आॅस्ट्रेलिायने होबार्टमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव २१२ धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात मंगळवारी चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव २८२ धावांत गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी आॅस्ट्रेलियाने दुसरा डाव ३ बाद १७९ धावसंख्येवर घोषित करीत विंडीजपुढे ४६० धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने चहापानापर्यंत ४ बाद १४६ धावांची मजल मारली होती. कर्णधार जेसन होल्डर व माजी कर्णधार दिनेश रामदिन यांनी सहाव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली, पण अखेरच्या चार विकेट झटपट माघारी परतल्यामुळे निर्धारित वेळेच्या १.३ षटकांपूर्वीच विंडीजला पराभवाला सामोरे जावे लागले. होल्डरने ८६ चेंडूंना सामोरे जाताना ६८ धावा फटकावल्या, तर रामदिनने ९० चेंडूंमध्ये ५९ धावांची खेळी केली. रामदिनची ही गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम खेळी ठरली. आॅस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फिरकीपटू नॅथन लियोन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सात बळी घेतले. अष्टपैलू मिशेल मार्शने दुसऱ्या डावात ६१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. पहिल्या डावात ५९ धावा फटकावणारा कार्लोस ब्रेथवेट दुसऱ्या डावात २ धावा काढून बाद झाला. त्याला लियोनने माघारी परतवले. कर्णधार होल्डरला मार्शने तंबूचा मार्ग दाखवला. केमार रोच (११) याला पेटिन्सनने, तर जेरोम टेलरला (००) मार्शने बाद केले. विंडीजने उपाहारानंतर डॅरेन ब्राव्हो, राजेंद्र चंद्रिका आणि मर्लोन सॅम्युअल्स यांच्या विकेट गमावल्या. पहिल्या डावात ८१ धावांची खेळी करणारा ब्राव्हो २१ धावा काढून बाद झाला. चंद्रिकाने ३७ धावा केल्या. त्याआधी, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने दुसरा डाव कालच्या ३ बाद १७९ धावसंख्येवर घोषित केला. स्मिथने नाबाद ७० धावांची खेळी केली. स्मिथ २०१५ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला. त्याने ७३.७० च्या सरासरीने १४७४ धावा फटकावल्या. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रुट अहे. त्याने १३७२ धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकपहिला डाव : आॅस्ट्रेलिया ५५१/३ घोषितवेस्ट इंडीज २७१ सर्व बाददुसरा डाव : आॅस्ट्रेलिया १७९/३ घोषित : जो बर्न्स ५, डेव्हिड वॉर्नर १७, उस्मान ख्वाजा ५६ : स्टिव्ह स्मिथ ७० नाबाद, मिशेल मार्श १८ नाबाद, गोलंदाजी : जेसन होल्डर ४९/२; कार्लोस ब्रेथवेट ३०/१, वेस्ट इंडीज २८२ सर्व बाद : क्रेग ब्रेथवेट ३१, राजेंद्र चंद्रिका ३७, डॅरेन ब्रावो २१, दिनेश रामदीन ५९, जेसन होल्डर ६८; गोलंदाजी : जेम्स पॅटिन्सन ४९/२, नॅथन लियान ८५/३, पिटर सिडल ३५/१, मिशेल मार्श ६१/४