शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

‘पंच’तारांकित विजयासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

By admin | Updated: February 14, 2015 18:20 IST

विश्‍वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली.

विश्‍वास चरणकर, कोल्हापूर
विश्‍वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली. नव्वदीच्या दशकानंतर क्रिकेटमध्ये ऑन दि फिल्ड आणि ऑफ दि फिल्ड बरीच उलथापालथ झाली. पण या सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे वेस्ट इंडिजची सद्दी संपून ऑस्ट्रेलिया नवा सम्राट म्हणून उदयास आला. १९८७ला त्यांनी पहिला विश्‍वचषक जिंकला. त्यानंतरच्या सहा वर्ल्डकपपैकी तीन वर्ल्डकप त्यांनी जिंकले. सर्वाधिक चारवेळ विश्‍वचषक जिंकणारा संघ म्हणून त्यांचा दबदबा आहे. 
१९७५ च्या पहिल्या विश्‍वचषकात ऑस्ट्रेलियाने थेट फायनलपर्यंत धडक मारली, पण वेस्ट इंडीजच्या पोलादी भिंतीपुढे त्यांचेा वादळ शमले. पुढच्या दोन विश्‍वचषकात त्यांना पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. 
भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त यजमापदाखाली झालेल्या १९८७ चा विश्‍वचषक हा ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्याची नांदी होती. या स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन पारंपारीक विरोधक फायनलमध्ये आमने-सामने आले. ऑस्ट्रेलियाला २५३ वर गुंडाळून इंग्लंडने सामन्यात वर्चस्व निर्माण केले, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ५0 षटकात ८ बाद २४६ पर्यंत इंग्लंडला रोखून धरले. इंग्लंडचा ८ धावांनी पराभव झाला. अँलन बोर्डरच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच जगज्जेता ठरला. कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या साक्षीने क्रिकेट जगतात एक नवा राजा राज्य करण्यास अवतरला होता. 
त्यानंतर १९९२ साली इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात पावसाच्या कृपेने पाकिस्तानला एक गुण जास्त मिळाल्यामुळे त्यांना सेमीफायनल गाठता आली नाही. तर १९९६ ला त्यांनी अंतिम फेरी गाठली पण श्रीलंकेने त्यांना पछाडून विश्‍वविजेतेपद जिंकले. १९९९, २00३ आणि २00७ असे सलग तीनवर्षे त्यांनी विश्‍वविजेतेपद मिळविले. म्हणजे सलग १५ वर्षे त्यांच्या डोक्यावर विश्‍वविजेतेपदाचा मुकुट होता. १९९९च्या विश्‍वचषकाची फायनल अक्षरश एकतर्फी झाली. ऑस्ट्रेलियाने पाकला केवळ १३२ धावात रोखले. हे आव्हान कांगारुंनी दोन गड्यांच्या मोबदल्यात २0 षटकातच गाठले. 
या स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीत त्यांना घरी घालवून त्यांच्या नावापुढे ‘माजी विश्‍वविजेते’ असे विशेषण लावले. यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हा सर्वात प्रबळ दावेदार आहे. इतिहासातील आकडेवारीवरुन त्यांच्याविषयी हे बोलले जात नाही, तर त्यांच्या संघातील खेळाडूंवर नजर टाकली की हे लक्षात येते. आजच्या ऑस्ट्रेलियन संघात प्रत्येक जागेवर त्यांच्याकडे तीन-तीन पर्याय आहेत. इतकेच नाही तर कर्णधारपदासाठीही त्यांच्याकडे तीन ऑप्शन आहेत. मायकेल क्लार्क फिट होवून संघात आला तर जॉर्ज बेलीला संघात ‘स्लॉट’च उपलब्ध होत नाही. 
आजच्या संघात सलामीवीर अँरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर ही जोडी सर्वात विध्वंसक समजली जाते. पाठोपाठ शेन वॉटसन, मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, बेली/क्लार्क, यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडीन हे सगळेच फार्मात आहेत. आयपीएलचा मिलेनियर ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर त्यांच्याकडे आहे.  अमेरिकेच्या शस्त्रसाठय़ात नसतील तेवढी क्षेपणास्त्रे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीत आहेत. गेली दोन वर्षे मिशेल जॉन्सन हा जगातील सर्व खेळपट्टयांवर धुमाकूळ घालतोय. त्यात मायदेशातील खेळपट्टय़ा म्हणजे त्यांच्यासाठी ‘सोने पे 
सुहागा.’ जोडीला मायकेल 
स्टार्क, जोश हेजलवूड, झेव्हिअर डोहर्टी, पॅट कमिन्स आणि जेम्स फॉल्कनेर अशी तगडी स्टारकास्ट  विरोधीपक्षाच्या चिंधड्या उडविण्यास सर्मथ आहे. 
बलाढय़ संघ, होमग्राउंड आणि प्रेक्षकांचा पाठिंबा या जोरावर ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्‍वचषक जिंकण्यास सज्ज आहे.
 
च्ऑस्ट्रेलियाने दुसर्‍यांदा विश्‍वचषक जिंकून विंडीजशी बरोबरी केली. २00३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वचषकात त्यांनी अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये त्यांची गाठ भारताशी पडली. अंतिम सामन्याच्या  पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेतली ती शेवटपर्यंत. 
च्रिकी पाँटिंगने उचलेला चषक सौरभ गांगुलीच्या हातात पाहण्याचे भारतीयांचे स्वप्न भंग पावले. २00७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेला विश्‍वचषक जिंकून ऑस्ट्रेलियाने हॅटट्रिक केली. सलग तीनदा आणि एकूण चार वेळा वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ आहे. विश्‍वचषकातील त्यांची ही मक्तेदारी भारताने २0११ मध्ये मोडीत काढली.
 
संघ असा.
ऑस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अँरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन