ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. ९ - ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर ६ गडी गमावत ३५० धावा केल्या आहेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) व स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.
रॉजर्स (९), वॉटसन (१४), वॉर्नर (१४५), मार्श (४१),लियॉन (३) व हॅडिन (०) बाद झाले तर कर्णधार मायकेल क्लार्कचे पाठीचे दुखणे पुन्हा उफाळून आल्याने तो ६० धावांवर खेळत असतानाच तंबूत परतला. तर स्मिथ ७१ धावावंर नाबाद असून त्याने ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. भारतातर्फे शमी व अॅरॉनने प्रत्येकी २ बळी तर , कर्ण शर्मा व इशांत शर्माने प्रत्येकी १ बळी टिपला.
डेव्हिड वॉर्नरने २५३ चेंडूत १४५ धावांची शानदार खेळी केली. बाऊंसर लागून मृत्यूमुखी पडलेला ऑस्ट्रेलियाचा खेलाडू फिलीप ह्युजला त्याने त्याचे शतक अर्पण केले.
दरम्यान सामन्याच्या सुरूवातीस दोन्ही संघातील खेळाडूंनी फिल ह्युजला श्रद्धांजली वाहिली. अॅडलेड ह्युजचे दुसरे घर होते. त्याला श्रद्धांजली वाहताना मैदानावरील अतिशय भावपूर्ण बनले होते.
दोन आठवडय़ांपूर्वी येथे दाखल झालेला भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामना खेळत आहे. महेंद्रसिंग धोनी अद्याप अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरलेला नाही.