शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ऑसी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

फिंच व मार्शची चमकदार कामगिरी, फिनची हॅट्ट्रिक व्यर्थ

फिंच व मार्शची चमकदार कामगिरी, फिनची हॅट्ट्रिक व्यर्थ
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवले
मेलबोर्न : सलामीवीर ॲरोन फिंचने स्पर्धेतील पहिले शतक झळकाविल्यानंतर मिशेल मार्शच्या (५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा १११ धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडतर्फे हॅट्ट्रिक नोंदविणारा स्टिव्हन फिन व नाबाद ९८ धावांची खेळी करणारा जेम्स टेलर यांचे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.
फिंच (१३५) आणि ग्लेन मॅक्सवेल (६६ धावा, ४० चेंडू) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ बाद ३४२ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टिव्हन फिनने अखेरच्या तीन चेंडूंवर तीन बळी घेत २०१५ च्या विश्वकप स्पर्धेत पहिली हॅट्ट्रिक नोंदविली. पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने विशाल धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा डाव ४१.५ षटकांत २३१ धावांत संपुष्टात आला. जेम्स टेलरने नाबाद ९८ धावांची खेळी केली. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही.
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियातर्फे मार्शने ९ षटकांत ३३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर मिशेल स्टार्क व मिशेल जॉन्सन यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ इंग्लंडची ६ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर टेलर व ख्रिस व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पण आवश्यक धावगती राखण्यात त्यांना अपयश आले.
त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियातर्फे फिंचने १२८ चेंडूंना सामोरे जाताना १३५ धावांची खेळी केली. त्यानंतर मॅक्सवेलच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मेलबोर्न क्रिकेट मैदानावर विशाल धावसंख्या उभारण्यात यश आले.