शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आशियाई कुस्ती; साक्षी मलिकचे रौप्यवर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 02:23 IST

आशियाई कुस्ती; विनेशसह अन्य दोन महिला मल्लांना कांस्य

नवी दिल्ली : सहजसोपा ड्रॉ मिळूनही आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिला शुक्रवारी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विनेश फोगाट ही पुन्हा एकदा जपानची मायू मुकेदा हिच्याकडून पराभूत झाल्यानंतर तिच्यासह अन्य दोन मल्लांना कांस्यपदक मिळाले. भारताने या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीसह एकूण ८ पदके जिंकली.

गुरुवारी दिव्या कांकरान, पिंकी आणि सरिता मोर यांनी सुवर्णपदके जिंकली होती. निर्मला देवी दुसऱ्या स्थानी राहिली. शुक्रवारी साक्षीने ६५ गटात रौप्य जिंकले. विनेशला ५३ किलो गटात कांस्य, युवा मल्ल अंशू मलिकला ५७ किलो आणि गुरशरन कौर हिला ७२ किलो वजन गटात कांस्यपदक मिळाले.साक्षी ही दोनदा जपानची नाओमी रूइके हिच्याकडून सुरुवातीला तसेच अंतिम फेरीत पराभूत झाली. २०१७ ला रौप्य जिंकणाºया साक्षीला या स्पर्धेत दुसऱ्यांदा रौप्य मिळाले. साक्षीला सुरुवातीच्या फेरीत १-२ ने व अंतिम फेरीत ०-२ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. ‘प्रतिस्पर्धी खेळाडू इतकी बलवान नव्हती, मात्र मी तिच्याविरुद्ध एकही गुण मिळवू शकले नाही,’ असे साक्षीने सांगितले.

उझबेकिस्तानची इसेनबायेव्हा हिच्याविरुद्ध उपांत्य फेरीत साक्षी ५-० ने पुढे होती मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूने दोनदा दोन गुणांची कमाई करीत गुणसंख्या ५-४ अशी केली. साक्षीने एका गुणाच्या फरकाने बाजी मारली. अंशू मलिकने ५७ किलो गटात कांस्य जिंकले, तर सोनम मलिकने ६२ किलो गटात लढत गमावली. बिगर आॅलिम्पिकच्या ७२ किलो वजन गटात गुरशरणसिंग कौर हिने मंगोलियाची सेवेगमेड एनखबायर हिचा प्ले आॅफमध्ये पराभव करीत पदक जिंकले. २०१३ पासून विनेशची पदक कमाईसर्वांच्या नजरा विनेशच्या कामगिरीकडे होत्या, मात्र ती मुकेदाकडून पराभूत होताच सुवर्णपदकाच्या चढाओढीतून बाहेर पडली. त्यानंतर व्हिएतनामच्या खेळाडूवर विजय नोंदवून विनेशने कांस्य जिंकले. विनेशला जपानच्या खेळाडूचा बलाढ्य बचाव भेदण्यात आजही अपयश आले. सुरुवातीला विनेश वारंवार पायांद्वारे हल्ला चढविण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र मुकेदाने तिचे प्रयत्न हाणून पाडले. विनेशला २०१३ नंतर प्रत्येकवेळी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळाले आहे.

टॅग्स :Wrestlingकुस्ती