शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

आशियाई कुस्ती : भारतीयांची सुवर्ण हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 02:36 IST

आशियाई कुस्ती : दिव्या, पिंकी, सरिता यांचे वर्चस्व; निर्मलाचे रौप्य पदक

नवी दिल्ली : दिव्या काकरान गुरुवारी येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून देणारी दुसरी भारतीय महिला मल्ल ठरली आहे. तिने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना चित केले. यामध्ये जपानची ज्यनिअर विश्व चॅम्पियन नरुहा मातसुयुकीचा केलेल्या पराभवाचाही समावेश आहे. दिव्याच्या या यशाचा जल्लोष सुरु असतानाच सरिता मोर (५९ किलो) आणि पिंकी (५५) यांनीही अंतिम फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सुवर्णपदाकाला गवसणी घातली. त्याचवेळी, ५० किलो वजन गटात निर्मलाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दिव्याने शानदार कामगिरी करत पाच मल्लांच्या ६८ किलो वजन गटात आपल्या सर्व चारही लढती जिंकल्या. या गटात राऊंड रॉबिन पद्धतीने सामने झाले. नवज्योत कौर आशियाई अजिंयपदमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मल्ल ठरली होती. तिने २०१८ मध्ये किर्गिस्तानच्या बिशकेकमध्ये ६५ किलो वजनगटात जेतेपद पटकावले होते. यजमान मल्लांसाठी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरला. चीनच्या मल्लांची अनुपस्थिती व जपानने आपल्या सर्वोत्तम मल्लांना न पाठविण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे आव्हान थोडे कमकुवत होते. दिव्याने ६८ किलो वजन गटात प्रथम कजाखस्तानच्या एलबिना कॅरजेलिनोव्हाचा पराभव केला. त्यानंतर तिने मंगोलियाच्या डेलगेरमा एंखसाइखानविरुद्ध सरशी साधली. डेलगेरमाविरुद्ध तिचा बचाव थोडा कमकुवत भासला, पण ती बाजी मारण्यात यशस्वी ठरली.

तिसऱ्या फेरीत दिव्याला उज्बेकिस्तानच्या एजोडा एसबर्जेनोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. या लढतीत तिने ४-० अशी आघाडी घेतल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला केवळ २७ सेकंदात नमवले. जपानच्या ज्युनिअर विश्व चॅम्पियनविरुद्धही दिव्याने ४-० अशी आघाडी घेतली होती. जपानच्या मल्लाने दुसºया टप्प्यात मजबूत सुरुवात करत दिव्याच्या डाव्या पायावर हल्ला केला, पण तिने गुण उजव्या पायावर आक्रमण करीत मिळवले. त्यामुळे लढत ४-४ अशी बरोबरीत झाली. मात्र, दिव्याने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याला चित केले आणि ती मॅटवरून बाहेर येऊन प्रशिक्षकांसह जल्लोष करू लागली. त्यानंतर रेफरीने अधिकृतपणे तिला ६-४ ने विजयी घोषित केले.सरिता मोर हिने महिलांच्या ५९ किलो वजनगटाच्या अंतिम लढतीत मंगोलियाच्या बातसेतसेगचा ३-२ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. २०१७ मध्ये ५८ किलो गटात रौप्यपदक पटकावल्यानंतर प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळणाºया सरिताने आपल्या पहिल्या दोन लढतींमध्ये कजाखस्तानच्या मदिना बाकरजिनोव्हा व किर्गिस्तानच्या नजीरा मार्सबेकजी यांचा तंत्राच्या आधारावर पराभव केला आणि त्यानंतर जपानच्या युमी कोनविरुद्ध १०-३ ने सरशी साधली.पिंकीने ५५ किलो गट अंतिम लढतीत मंगोलियाच्या डुलगुन बोलोरमाला नमवत सुवर्ण जिंकले. पिंकीने अंतिम लढतीत बोलोरमाचा २-१ ने पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासात सुवण पटकावणारी ती केवळ तिसरी भारतीय महिला ठरली. पिंकीने पहिल्या फेरीत उज्बेकिस्तानच्या शकिदा अखमेदोव्हाला चित केले, पण पुढच्या फेरीत ती जपानच्या काना हिगाशिकाव्हाविरुद्ध पराभूत झाली. पिंकीने त्यानंतर उपांत्य फेरीत मारिना जुयेवाचा ६-० ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली.थोडक्यात हुकले यशच्५० किलो वजनगटाच्या अंतिम लढतीत जपानच्या मिहो इगारशीविरुद्ध निर्मलाला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रकुल २०१० ची रौप्यपदक विजेता निर्मलाला अंतिम लढतीत इगारशीविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला.च्हरयाणाच्या निर्मलाने यापूर्वी मंगोलियाच्या मुंखनारबयामबासुरेन हिचा ६-४ असा पराभव केला होता. यानंतर तिने उज्बेकिस्तानच्या दौलतबाइक यकशिममुरातोव्हाचा दक्ष तंत्राच्या आधारावर पराभव करुन आगेकूच केली होती.

टॅग्स :Wrestlingकुस्ती