शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

आशियाई कुस्ती स्पर्धा: दिव्या काकरान, मंजू कुमारीला कांस्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 02:54 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या दिव्या काकरान व मंजू कुमारी यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

शियान (चीन) : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या दिव्या काकरान व मंजू कुमारी यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. दिव्याने ६८ किलो गटात तर मंजू कुमारीने ५९ किलो गटातून ही कामगिरी केली.दिव्याने कास्यंपदकासाठीच्या प्ले आॅफ सामन्यात मंगोलियाच्या बाटसेतसेग सोरांंजोनबोल्ड हिला चितपट करत तिसरे स्थान पटकावले. अन्य सामन्यात मंजू कुमारीने व्हिएतनामच्या थि हुओंग दाओ हिला ११-२ अशा गुणफरकाने पराभूत केले. भारताच्या सीमाने प्ले आॅफमध्ये प्रवेश केला होता. मात्र ५० किलो वजन गटात तिला कजागिस्तानच्या व्हेलेंटिना इवानोवना इस्लामोवा ब्रिक हिच्याकडून ५-११ असे पराभूत व्हावे लागले.तत्पूर्वी दिव्या व मंजू यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना कास्यपदकासाठी लढावे लागले. सीमाने रेपचेज जिंकल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत दिली. दुखापतीनंतर मैदानात उतरलेल्या दिव्याला उपांत्य फेरीत चीननच्या फेंग झोऊ हिच्याकडून ४-१४ असे पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत दिव्याने व्हियतनामच्या होंग थुये एनगुएनवर १०-० अशी एकतर्फी मात केली होती.मंजू कुमारीला उपांत्यफेरीत मंगोलियाच्या बाटसेतसेग अल्टानसेतसेग हिच्याकडून ६-१५ असे पराभूत व्हावे लागले. मंजूने उपांत्यपूर्वफेरीत कजागिस्तानच्या मदिना बाकरबेरजेनोव्हाला ५-३ असे पराभूत केले. सीमा पात्रता फेरीत जपानच्या युकी इरीकडून पराभूत झाली होती. मात्र रेपेजेज फेरीत तिला संधी मिळाली. ललिता व पूजा पराभूत झाल्याने ५५ व ७६ किलो गटातील भारताचे आव्हान यापूर्वीच संपले आहे. (वृत्तसंस्था)