शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आशियाई नेमबाजी : भारतीय युवांनी केली २१ पदकांची लयलूट, आगामी युवा आॅलिम्पिकसाठी ‘कोटा’ही मिळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:36 AM

सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांनी जपान (वाको सिटी) येथे पार पडलेल्या १० व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करत आगामी २०१८ मध्ये होत असलेल्या युवा आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी कोटाही मिळवला.

नवी दिल्ली : सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांनी जपान (वाको सिटी) येथे पार पडलेल्या १० व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करत आगामी २०१८ मध्ये होत असलेल्या युवा आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी कोटाही मिळवला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताने चार पदकांची कमाई करताना ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्य अशी स्पर्धेत एकूण २१ पदकांची लयलूट केली.सौरभने अंतिम दिवशी पुरुषांच्या १० मीटर पिस्तुल युवा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक जिंकले. तसेच मनुने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात रौप्यपदकावर नाव कोरले. अंतिम दिवसाच्या सुरुवातीलाच ज्युनिअर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात ज्युनिअर विश्व चॅम्पियन यशस्विनी सिंग देसवाल आणि महिमा अग्रवाल यांनी अंतिम फेरी गाठली. त्याचवेळी, योगिता ३७२ गुणांसह अकाराव्या स्थानावर राहिली. आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत यशस्विनी आणि महिमा दोघीही पदक जिंकण्यात अपयशी ठरल्या असल्या, तरी सांघिक गटात मात्र भारतीय त्रिकुटाने ११२८ गुणांचा वेध घेत रौप्यवेध घेतला. शाहू मानेने स्पर्धेच्या दुसºया दिवशी युथ आॅलिम्पिकचा कोटा मिळविला होता.- पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल युवा गटात दोन भारतीयखेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. पात्रता फेरीत अर्जुन सिंग चीमा (५७७) अव्वल स्थानी राहिला, तर सौरभने ५७३ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्याचवेळी, सुरिंदर सिंग ५६१ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत सौरभने जबरदस्त प्रदर्शन करताना सर्वाधिक २४३.१ गुणांसह सुवर्ण पटकावले. यासह त्याने युवा आॅलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला. त्याचबरोबर सौरभ, सुरिंदर आणि अर्जुन यांनी सांघिक गटात सर्वाधिक १७११ गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला.- महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटाची अंतिम फेरी गाठणारी मनु एकमेव भारतीय ठरली. पात्रता फेरीत ३८२ गुणांसह अव्वल स्थान पटकावणारी मनु अंतिम फेरीत मात्र अडखळली. यामुळे १० शॉट्स नंतर ती थेट आठव्या स्थानी घसरली. मात्र, येथून तिने जबरदस्त पुनरागमन करताना थेट रौप्यपदकाला गवसणी घातली.- या वेळी चीनच्या जियारुशुआन शियाओने केवळ ०.१ गुणाच्या आघाडीने सुवर्ण पटकावले. शियाओने २३६.१, तर मनुने २३६.० गुणांसह वर्चस्व राखले.

टॅग्स :Shootingगोळीबार