शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : मणिपूर जळतंय, आई-वडिलांची चिंता; रोशिबिना देशासाठी लढली अन् रौप्य जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 07:46 IST

Asian Games 2023 :  भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली.

Asian Games 2023 :  भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. भारताच्या एकूण पदकांची संख्या ही २२ झाली असून त्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकं आहेत. आज रोशिबिना देवीने ( Roshibina Devi ) भारताच्या पदकाचे खाते उघडले. वूशू ( Wushu) मध्ये ६० किलो वजनी गटात रोशिबिनाने रौप्यपदक जिंकले. पण, तिच्या या कामगिरीला दाद मिळायला हवी. मणिपूरची रोशिबिना रोज आपल्या आई-वडिलांच्या चिंतेने हैराण असते.... मणिपूर जळतंय... आपले आई-वडील सुरक्षित आहेत का, ही चिंता तिला सतावते. याही परिस्थितीत ती लढल अन् देशासाठी रौप्यपदक जिंकले. 

२०१८च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. तिला आज फायनलमध्ये चीनच्या वू एस्कविरुद्ध ०-२ अशी हार पत्करावी लागली.''दररोज मी माझ्या कुटुंबियांशी बोलते. पुढे त्यांच्याशी बोलता येईल की नाही ही भीती सतत मनात असते,''असे रोशिबिना फायनलला पोहोचल्यानंतर म्हणाली होती.  

बॅडमिंटन - महिला सांघिक गटात भारताने ३-० अशी मंगोलियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. पी व्ही सिंधूने पहिली मॅच २१-२,२१-३ अशी जिंकली. त्यानंतर अस्मिता चलिहा व अनुपमा उपाध्याय यांनी विजय मिळवला. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Manipur Violenceमणिपूर हिंसाचार