शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

PAK vs IND : भारताची 'गोल्डन' कामगिरी! पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून जिंकले पदक, शेजारी चिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 15:58 IST

Asian Games 2023 IND vs PAK : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताने शनिवारी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवून १०वे सुवर्णपदक नावावर केले.

Asian Games 2023 IND vs PAK : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताच्या नेमबाजांनी आणखी एक पदकाची कमाई करून दिली. सरबज्योत सिंग आणि दिव्या सुब्बाराजू यांनी शनिवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक गटात रौप्यपदक जिंकले. त्यापाठोपाठ टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत ऋतुजा भोसले आणि रोहन बोपन्ना या जोडीने सुवर्णपदक जिंकले. पण, खरी चुरस स्क्वॉशच्या पुरुष सांघिक गटाच्या गोल्ड मॅचमध्ये पाहायला मिळाली. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोर होते आणि भारतीय खेळाडूंनी ०-१ अशा पिछाडीवरुन मुसंडी मारली अन् २-१ असा विजय मिळवला.पाकिस्तानच्या इक्बाल नासीरने पहिल्या सामन्यात भारताच्या महेश माणगावकरचा ११-८,११-३,११-२ असा पराभव करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर माजी आशियाई पदक विजेता अन् संघातील अनुभवी खेळाडू सौरव घोषाल आला अन् त्याने पाकिस्तानच्या आसीम खानला ११-५,११-१, ११-३ असे पराभूत करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानचा नूर झमान आणि भारताचा अभय सिंग हे समोरासमोर होते. दोन्ही खेळाडूंमध्ये कोर्टवर ठसन पाहायला मिळाली... दोघंही एकमेकांना ब्लॉक करताना दिसले..पाकिस्तानच्या खेळाडूकडून रडीचा डाव सुरू होता. त्याच्याकडे २-१ अशी आघाडी होती. पण, अभय सिंगने चौथा गेम ११-९ असा जिंकून सामना २-२ असा बरोबरीत आणला.  

भारतीय खेळाडूने निर्णायक गेममध्ये ०-२ अशा पिछाडीवरून ६-६ अशी बरोबरी मिळवली, परंतु पाकिस्तानी खेळाडू जाणीवपूर्वक  अभयचा मार्ग अडवत होता हे स्पष्ट दिसत होते. अभयने तरीही त्याला तोडीसतोड उत्तर दिले. पण, पाकिस्तानी खेळाडूने रडीचा डाव खेळून ९-७ अशी आघाडी घेतली. पण, अभयने ११-१० अशी आघाडी घेतली आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. अभयने ११-७, ९-११,८-११, ११-९, १२-१० असा विजय मिळवला. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान