शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Asian Games 2018: सुवर्ण मार्गदर्शक आणि कुटुंबीयांना समर्पित : अमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 01:56 IST

- अभिजित देशमुख(थेट जकार्ता येथून)उझबेकिस्तानचा बॉक्सर हान्सबॉय डुझमोतोव्हला पराभूत करणे माझ्यापुढे आव्हान होते. कारण तो रिओ आॅलिम्पिक स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता होता. त्याची चपळता आणि समोरच्या खेळाडूला कसे कैचित पकडायचे, याची रणनीती वाखानण्याजोगी आहे. तो अतिशय बुद्धिमान बॉक्सर आहे. मी आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी दोनदा त्याचाविरुद्ध खेळलो होतो. गेल्या वर्षी त्याने मला ...

- अभिजित देशमुख(थेट जकार्ता येथून)उझबेकिस्तानचा बॉक्सर हान्सबॉय डुझमोतोव्हला पराभूत करणे माझ्यापुढे आव्हान होते. कारण तो रिओ आॅलिम्पिक स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता होता. त्याची चपळता आणि समोरच्या खेळाडूला कसे कैचित पकडायचे, याची रणनीती वाखानण्याजोगी आहे. तो अतिशय बुद्धिमान बॉक्सर आहे. मी आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी दोनदा त्याचाविरुद्ध खेळलो होतो. गेल्या वर्षी त्याने मला दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये नमविले आहे. पण आज मी आणि माझे मार्गदर्शक सँटियागो निइवा यांनी विशेष डावपेच त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी आखले होते. त्या प्रमाणेच खेळून गेल्या दोन पराभवांचा बदला घेत तिरंगा फडकाविला. आज मी त्याच्यापेक्षा चपळ होतो आणि त्याच्या प्रत्येक हालचालीसाठी माझ्याकडे प्रतिडाव तयार होता. रिंगमध्ये उरताना मी आत्मविश्वासाने उरतलो. कोणतेही दडपण मनावर येऊ दिले नाही. त्याच्याविरुद्ध लढतीपूर्वी मी आणि प्रशिक्षक सँटियागोंबरोबर त्याच्या काही सामन्याचे व्हिडीओ पहिले आणि त्यानुसार आम्ही त्याच्याविरुद्ध लढतीची रणनीती आखली होती. सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद तर आहेच पण तो द्विगुणीत झाला आहे, कारण हान्सबॉयला पराभूत केल्याचे समाधान वेगळेच आहे. माझे सुवर्णपदक मी माझे कुटुंबीय व कोच सँटियागो यांना समर्पित करतो, असे अमितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या आशियाई क्रीडा स्पर्धेत माझ्यामुळे एकमेव तिरंगा बॉक्सिंगचा स्टेडियममध्ये फडकला आणि भारताचे राष्ट्रगान सुरू झाले तेव्हा मी अश्रू रोखू शकलो नाही.जिद्द व आत्मविश्वासावर सुवर्ण जिंकले : शिबनाथपहिल्यांदा या खेळाचा आशियाई स्पर्धेत समावेश झाला आहे. येथे आल्यावर प्रथम थोडे गोंधळल्यासारखे झाला. कारण आमचे वय लक्षात घेता आम्ही काही करू शकू का नाही असे सर्वांना वाटले. पण आमच्या दोघांची जिद्द, आत्मविश्वास आणि खेळातील बारकावे हेरून पुढे चाल करणे यामुळे आम्ही सुवर्ण जिंकून इतिहास रचू शकलो असे शिबनाथ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पुरुषांच्या दुहेरी ब्रिज स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणारे प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार ने इतिहास रचला आहे. ६१ वर्षीय प्रणब बर्धन अतापर्यन्त आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे सुवर्ण पदक जिंकणारे सर्वात ज्येष्ठ खेळाडू बनले आहे.अमितकडे २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे कौशल्ये आहे. तो अत्यंत मेहनती आणि बुद्धिमान बॉक्सर आहे, सामन्यात विविध रणनीती वापरून तो विरोधकला गोंधळून टाकतो. तो खूप चपळ आहे, सगळ्या भारतीय बॉक्सरमध्ये खोडकर सुद्धा. कधी कधी तो एखादा सत्र टाळतो पण पुढच्या सत्रात तो कसर काढतो. मागच्या एक वर्षात त्याने त्याच्या खेळात खूप बदल घडवून आणला आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतसुद्धा पदक जिंकले होते.- सँटियागो निइवा,अमित पांघलचे प्रशिक्षक

टॅग्स :boxingबॉक्सिंग