शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Asian Games 2018: सुमारे १३ हजार स्वयंसेवक, ४० हजार सुरक्षारक्षक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 05:49 IST

आॅलिम्पिक, राष्ट्रकुल, जागतिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो वा कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे त्या स्पर्धेच्या काळात तैनात असलेल्या स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षकांच्या कामावर अवलंबून असते.

- अभिजित देशमुख

जकार्ता: आॅलिम्पिक, राष्ट्रकुल, जागतिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो वा कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे त्या स्पर्धेच्या काळात तैनात असलेल्या स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षकांच्या कामावर अवलंबून असते. या तैनात असलेल्या स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षकांना या स्पर्धेच्या काळात आलेले विविध क्रीडा महासंघांचे पदाधिकारी, खेळाडू, तांत्रिक अधिकारी यांच्याबरोबर अदबीने कसे बोलायचे, वागायचे याचे प्रशिक्षण स्पर्धेच्या आधी सुमारे महिनाभर दिले जाते. जकार्ता आशियाई स्पर्धासुद्धा त्यात अपवाद नाही.इंडोनेशिया आणि पालेमबंग या दोन ठिकाणी होत असलेली ही स्पर्धा यशस्वी व्हावी, यासाठी सुमारे १३ हजार स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आहे. हे स्वयंसेवक इंडोनेशियाच्या विविध भागांमधून जकार्ता-पालेमबंग येथे आले आहेत. यापैकी ८,१०० स्वयंसेवक १७ ते २३ वयोगटातील आहेत. बाकीचे स्वयंसेवक २३ ते ४० या वयोगटातील आहेत. यातील ६० टक्के मुली आहेत. या स्वयंसेवकांची जबाबदारी खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या निवासस्थानी आणून सोडणे अशी आहे. स्टेडियम व्यतिरिक्त हे स्वयंसेवक एअरपोर्ट, बसस्टॉप, पत्रकार कक्ष, ज्या ठिकाणी जास्त रहदारीमुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये अडचण येऊ शकते त्या रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांची नेमणूक केली गेली आहे. यामुळे तांत्रिक अधिकारी आणि खेळाडू यांना खूप सहकार्य होत आहे.पदक वितरणाच्या वेळी यंत्रणेत बिघाड....पुरुषांच्या जलतरण २०० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेच्या पदक वितरण समारंभाच्या वेळी ध्वज वर नेणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे तिन्ही पदक विजेत्या देशांचे झेंडे खाली पडले आणि स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला. पुरुषांची २०० मीटर फ्रीस्टाईलची स्पर्धा संपते. यामध्ये चीनचा सन यांगने सुवर्ण, जपानचा काटसू माटसूमोटाने रौप्य तर चीनच्या जी झिंगजीनने कांस्यपदक जिंकले. पदक वितरणाच्यावेळी त्या वितरणांचे प्रमुख पाहुणे आणि पदकविजेते खेळाडू विजयी मंचाजवळ हजर होतात. पदक विजेत्यांची नावे पुकारली जातात. पदक वितरण होते आणि सुवर्णपदक विजेत्या चीन देशाचे राष्टÑगीत सुरू होताच तिन्ही देशांचे झेंडे वर जाण्याची वाट प्रमुख पाहुणे, खेळाडू आणि स्टेडियममध्ये उपस्थित पाठीराखे पाहात होते. मात्र झेंडा नेण्याच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे तिन्ही देशांचे झेंडे वर नेण्यात स्वयंसेवक अयशस्वी झाले. त्यामुळे तेथे उपस्थित चीनचे प्रेक्षक ओरडू लागले. चीनचा सुवर्णपदक विजेता सून यांग भडकला आणि अधिकाºयांना परत एकदा ध्वजरोहण करा आणि चीनचे राष्ट्रगीत वाजवा, असा हट्ट धरला. आयोजकांनी परत चीनचे राष्ट्रगीत वाजवले, या वेळेस मात्र अधिकाºयांनी तिन्ही देशांचे झेंडे हातात पकडले होते. काही वेळातच नवीन साधन बसवले गेले.३४८ खेळाडूंचे स्थलांतर...पालेमबंगच्या जाकबरिंग क्रीडाग्राममध्ये क्षमेतेपेक्षा जास्त खेळाडू व अधिकाºयांना सुरुवातीला ठेवण्यात आल्यामुळे तेथील परिस्थिती योग्य नसल्यामुळे ३४८ खेळाडू आणि अधिकाºयांना तेथून जवळच्या हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. तीन हजार खेळाडू व अधिकारी क्षमता असलेल्या क्रीडाग्राम हाऊसफुल झाल्याने हा निर्णय आयोजकांच्यावतीने घेण्यात आला आहे. काही स्पर्धा उशिरा असल्याने खेळाडूची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. क्रीडाग्राममध्ये व्यवस्था चांगली आहे. खेळाडूंना पाहिजे तसा आहार आहे; परंतु रूम्स लहान असल्याचे भारतीय संघाचे टेनिसचे मार्गदर्शक झिशान अली यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सुरक्षारक्षकांची करडी नजर...या स्पर्धेदरम्यान कोणालाही त्रास किंवा कोणतेही अघटिक कृत्य घडू नये यासाठी सर्व स्टेडियमसह बसस्थानके, महत्त्वाचे रस्ते, विमानतळ या ठिकाणी सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना तैनात केले आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळी ८५०० पोलीस गेलोरो बंग करणो स्टेडियमजवळ तैनात होते. ३५० नवीन तंत्रज्ञानचे सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा शहरात बसवण्यात आले आहे. क्रीडाग्रामजवळसुद्धा ५०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी २४ तास निगराणी करत आहेत. सुमात्रा, इंडोनेशिया येथे काही महिन्यांपूर्वीच आतंकवादी हल्ल्यामुळे आयोजकांनी परदेशी अधिकारी आणि खेळाडूंच्या सुरक्षेची खूपच काळजी घेतली आहे.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धा