शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई मुष्टियुद्ध : अमित, लवलिना यांचे कांस्यपदकावर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:37 IST

पहिल्यांदाच मिळवले ऑलिम्पिक तिकीट

अम्मन : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला भारताचा स्टार मुष्टियोद्धा अमित पंघाल याला ५२ किलो गटाच्या उपांत्य फेरीत अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. यामुळे त्याला आशियाई आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी, महिलांमध्ये लवलिना बोरगोहेन हिलाही उपांत्य फेरीत पराभव झाल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्य फेरीत दोघांचा पराभव झालेला असला तरी त्यांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत पहिल्यांदाच आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केलेले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत जागतिक रौप्य विजेत्या आणि स्पर्धेत अग्रमानांकन असलेल्या अमितला चीनच्या जियांगौन हू याच्याविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला. हा विजय हूसाठी एक प्रकारे वचपाच होता. कारण गेल्या वर्षी अमितने आशियाई उपांत्य फेरीत आॅलिम्पिक आणि जागतिक कांस्यपदक विजेत्या हू याला पराभवाचा धक्का दिला होता.

उपांत्य फेरीपर्यंत धडाकेबाज खेळ केलेल्या अमितला मंगळवारी हूविरुद्ध आपल्या लौकिकास साजेसा खेळ करण्यात यश आले नाही. मोक्याच्या वेळी निर्णायक प्रत्युत्तर देण्यात आलेल्या अपयशामुळे अखेर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.दुसरीकडे, दोन वेळची जागतिक कांस्यपदक विजेती आणि स्पर्धेतील दुसरी मानांकित बोरगोहेनला चीनच्या हाँग गुविरुद्ध ०-५ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील तिसरी मानांकित आणि २०१८ साली जागतिक रौप्यपदक जिंकलेल्या हाँगने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना बोरगोहेनला आपला खेळ करण्याची एकही संधी दिली नाही.

बोरगोहेनने सामन्यात पुनरागमनाचा अनेकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हाँगच्या धडाक्यापुढे तिला बाजी मारण्यात यश आले नाही. अंतिम फेरी गाठलेल्या हाँगला आता सुवर्णपदकासाठी विश्वविजेत्या आणि स्पर्धेतील अग्रमानांकित तैवानच्या चेन नियेन चीनविरुद्ध भिडावे लागेल. विकास अंतिम फेरीतविकास कृष्णनने ६९ किलो गटातून अंतिम फेरीत धडक दिली आहे. डाव्या भुवईच्या खाली दुखापत झाल्यानंतरही विकासने कजाखस्तानच्या अब्लाइखान जुसुपोव याला पराभूत केले. सुवर्ण पदकासाठी विकास जॉर्डनच्या एशेह हुसैनविरुद्ध लढणार असून एशेहने आशियाई सुवर्ण विजेत्या आणि अग्रमानांकीत बोबो उस्मान बातुरोव याला नमविले.

टॅग्स :boxingबॉक्सिंग