शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई बॅडमिंटन : भारताला कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 03:21 IST

आशियाई बॅडमिंटन : उपांत्य फेरीत इंडोनेशियाविरुद्ध पराभूत

मनिला : लक्ष्य सेनने आशियन गेम्सचा चॅम्पियन जोनाथन क्रिस्टीविरुद्ध धक्कादायक विजय नोंदवला असला तरी भारतीय पुरुष संघाला त्याचा लाभ घेता आला नाही. भारतीय संघाला शनिवारी आशियाई टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत दोनवेळचा गत चॅम्पियन इंडोनेश्यिाविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. लक्ष्य (३१ वे मानांकन) याने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील जोनाथनविरुद्ध एकेरीच्या दुसऱ्या लढतीत २१-१८, २२-२० ने सनसनाटी विजय मिळवत भारताचे आव्हान कायम राखले. एकेरीच्या पहिल्या लढतीत साई प्रणीत पहिल्या गेममध्ये अँथोनी जिनटिंगविरुद्ध ६-२१ ने पिछाडीवर असताना रिटायर्ड हर्ट झाला.

२०१८ चा सालोर्लक्स ओपन चॅम्पियन शुभंकर डे याने एकेरीच्या तिसºया लढतीत जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या शेसार हिरेन रुस्तावितोचा २१-१७, २१-१५ ने पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला. त्यामुळे भारतीय संघाने २-२ अशी बरोबरी साधली.त्यामुळे दुहेरीची दुसरी लढत निर्णायक ठरली. त्यात चिराग शेट्टी व लक्ष्य सेन कोर्टवर उतरले, पण त्यांना मार्कस फर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजया सुकामुलजियो या जागतिक क्रमवारीतील अव्वल जोडीची बरोबरी साधता आली नाही. त्यांना केवळ २४ मिनिटांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. इंडोनेशियाच्या जोडीने २१-६, २१-१३ ने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. भारतीय पुरुष संघ या स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी ठरला. यापूर्वी भारतीय संघाने २०१६ मध्ये हैदराबादमध्येही कांस्यपदक पटकावले होते. एम.आर. अर्जुन व ध्रुव कपिला या दुहेरीच्या जोडीने कडवा संघर्ष केला, पण त्यांना तीन वेळचे विश्व चॅम्पियन व दुसरे मानांकनप्राप्त मोहम्मद अहसन व हेंड्रा सेटियावानविरुद्ध १०-२१, २१-१४, २१-२३ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंडोनेशिया संघाने २-१ अशी आघाडी घेतली.

टॅग्स :BadmintonBadminton