शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
3
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
4
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
5
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
6
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
7
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
8
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
9
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
10
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
11
भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
12
२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा 
13
"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
14
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
15
जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
16
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
17
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
18
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
19
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
20
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

अश्विन - साहा यांच्या जोरावर भारताची समाधानकार मजल

By admin | Updated: August 10, 2016 23:59 IST

आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साहा (१०४) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३५३ धावा उभारल्या

सर्वबाद ३५३ धावा : दोघांचेही निर्णायक शतक; सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारीग्रास इसलेट, दि. ११  : आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साहा (१०४) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३५३ धावा उभारल्या. प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर अश्विन - साहा यांनी सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक भागीदारी करुन भारताला सावरले.

डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमानांनी भारताचे आघाडीचे ५ फलंदाज बाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत अश्विन - साहा यांनी त्यांना बळी घेण्यापासून रोखले. ५ बाद २३४ या धावसंख्येपासून सुरुवात करताना या जोडिने पहिल्या सत्रात ८२ धावांची भर टाकली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासाने खेळताना अश्विन - साहा जोडिने दमदार खेळ करताना यजमानांचा चांगलाच सामाचार घेतला.

अश्विनने २९७ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व एका षटकारासह दमदार ११८ धावांची संयमी आणि निर्णायक खेळी केली आहे. तर त्याला मोलाची साथ दणाऱ्या साहाने २२७ चेंडूत १३ चौकारांसह १०४ धावा फटकावल्या. अल्झारी जोसेफने साहाला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर अवघ्या १४ धावांत ४ बळी गेल्याने भारताचा डाव संपुष्टात आला. अष्टपैलू रविंद्र जडेजा (६) झटपट परतल्यानंतर भुवनेश्वर कुमार व इशांत शर्मा खेळपट्टीवर हजेरी लावून गेले. तर मिग्युएल कमिन्सने अश्विनला बाद केले. संक्षिप्त धावफलक :भारत (पहिला डाव) : ११५ षटकात सर्वबाद ३५३ धावा (लोकेश राहुल ५०, अजिंक्य रहाणे ३५, आर. अश्विन खेळत आहे ११८, वृध्दिमान साहा १०४; मिग्युएल कमिन्स ३/५४, अल्झारी जोसेफ ३/६९, रोस्टन चेस २/७०, शॅनन गॅब्रियल २/८४)