शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड-आॅस्ट्रेलिया यांच्यात आजपासून ‘अ‍ॅशेस संग्राम’

By admin | Updated: July 8, 2015 01:02 IST

क्रिकेट विश्वातील सर्वाधिक चर्चित आणि संघर्षपूर्ण अ‍ॅशेस मालिकेला बुधवारपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ होत आहे.

कार्डिफ : क्रिकेट विश्वातील सर्वाधिक चर्चित आणि संघर्षपूर्ण अ‍ॅशेस मालिकेला बुधवारपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेसची मागील मालिका आॅस्ट्रेलियाने ५-० अशी एकतर्फी जिंकली होती. डावखुरा मिशेल जॉन्सन याने भेदक माऱ्याद्वारे इंग्लंडचे कंबरडे मोडले होते. त्याआधी इंग्लंडने सलग तीनदा ही मालिका जिंकली, हे विशेष. २००९मध्ये २-१ने, २०१०-११मध्ये ३-१ने आणि २०१३मध्ये ३-० अशा फरकाने इंग्लंडने विजयाची नोंद केली. आॅस्ट्रेलियाने २०१३मध्ये इंग्लंड दौरा केला तेव्हा इंग्लंडने त्यांच्याविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. आता दोन्ही संघ नव्याने सज्ज आहेत. आयसीसी क्रमवारीत आॅस्ट्रेलिया १११ गुणांसह दुसऱ्या, तर इंग्लंड ९६ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. उभय संघांच्या रँकिंगमध्ये ४ स्थानांचे अंतर असेल; पण इंग्लंडला नमविणे आॅस्ट्रेलियासाठी सोपे नाही. आॅस्ट्रेलियाने विंडीजला त्यांच्याच देशात २-०ने पराभूत केले. इंग्लंडने आपल्या देशात न्यूझीलंडला १-१ असे बरोबरीत रोखले. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या तुलनेत आॅस्ट्रेलिया सध्या भक्कम आहे. कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क म्हणाला, ‘‘आम्ही खेळभावना जपून आक्रमक खेळ करू. आमचा संघ आक्रमकतेसाठी ओळखला जात असला, तरी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळभावनेचा सन्मान करू. आम्ही त्याचे कधीही उल्लंघन केले नाही. खेळाडूंना मर्यादेत राहून खेळणे माहिती आहे. संयमित आणि शिस्तबद्ध खेळ करणे, हे आमचे ध्येय आहे.’’ क्लार्क करिअरमध्ये चौथ्यांदा अ‍ॅशेस दौऱ्यावर इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. मालिका सुरू होण्याआधी वेगवान गोलंदाज रेयॉन हॅरिस याने घेतलेली निवृत्ती त्याच्यासाठी चिंतेचा विषय असेल. खेळपट्टीबाबत क्लार्क म्हणाला,‘‘मैदानावर गवत अधिक असल्याचे कळले. यजमानांना आधी फलंदाजी करताना पाहणे रंजक ठरेल. आधी फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजी करायची झाल्यास झटपट गुंडाळण्याचे लक्ष्य असते. आॅस्ट्रेलियात सुरुवात चांगली झाल्यास अर्धशतक ठोकणे सहजसोपे जाते. ’’इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक याने युवा खेळाडूंच्या बळावर आॅस्ट्रेलियाला आव्हान देण्याचे ठरविले आहे. संघात असलेल्या नव्या चेहऱ्यांना अनुभव कमी असेलही, पण आत्मविश्वास व झुंजारवृत्तीच्या बळावर हा संघ आॅस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरू शकण्यात सक्षम वाटतात. इंग्लंडचे कोच ५२ वर्षांचे आॅस्ट्रेलियन ट्रॅव्हर बेलिस आहेत. जॉन्सनला थोपविण्यासाठी त्यांनी नवे डावपेच आखले असावेत. मागच्या मालिकेत त्याने एकट्याच्या बळावर अ‍ॅशेस जिंकून दिले होते. इंग्लंडसाठी आनंदी वार्ता अशी, की त्यांचा कर्णधार कूक याला सूर गवसला आहे. (वृत्तसंस्था)