इस्लामाबाद:पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अरशद नदीमच्या खराब कामगिरीनंतर एक मोठे राजकीय वादळ उठले आहे. नदीमचे प्रशिक्षक आणि पंजाब ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष सलमान इकबाल यांच्यावर पाकिस्तान ॲमेच्युअर ॲथलेटिक्स फेडरेशनने (PAAF) आजीवन बंदी घातली आहे. असोसिएशनच्या घटनेचे उल्लंघन करून निवडणूक घेतल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली असली, तरी यामागे प्रशिक्षकाने केलेला महासंघाच्या गैरकारभाराचा पर्दाफाश हे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अरशद नदीमची कामगिरी निराशाजनक झाली होती. यानंतर पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डने प्रशिक्षक सलमान इकबाल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. इकबाल यांनी PSB ला पाठवलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती दिली होती.
त्यांनी उघड केले की, गेल्या एका वर्षापासून PAAF कडून नदीमच्या प्रशिक्षण आणि क्रिडा सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. PAAF च्या मदतीशिवाय नदीमच्या दक्षिण आफ्रिकेतील प्रशिक्षणासाठी आणि पायाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांना मित्रांकडून आर्थिक मदत घ्यावी लागली होती.
एका दिवसात बंदीचा निर्णयसलमान इकबाल यांनी PSB ला हे सविस्तर उत्तर दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात PAAF च्या चौकशी समितीने त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याची शिफारस केली. पंजाब ॲथलेटिक्स असोसिएशनच्या निवडणुका अवैधपणे घेतल्याच्या तांत्रिक कारणास्तव ही बंदी जाहीर करण्यात आली आहे. या बंदीमुळे इकबाल यांना कोणत्याही ॲथलेटिक्स गतिविधीत भाग घेण्यास, प्रशिक्षण देण्यास किंवा कोणत्याही पदावर राहण्यास मनाई करण्यात आली आहे. इकबाल हे या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
प्रशिक्षकाने महासंघातील गैरव्यवहाराचा आणि खेळाडूंकडे झालेल्या दुर्लक्षाचा मुद्दा उघडकीस आणल्यानंतर लगेचच ही कठोर कारवाई झाल्याने, पाकिस्तानच्या क्रीडा जगतात 'सत्य बोलल्याबद्दलची शिक्षा' असल्याची चर्चा रंगली आहे.
Web Summary : Arshad Nadeem's coach, Salman Iqbal, faced a lifetime ban after revealing neglect in athlete training and PAAF's mismanagement. He exposed lack of support for Nadeem, leading to swift retaliation and raising concerns about truth's consequences in Pakistan's sports.
Web Summary : अरशद नदीम के कोच सलमान इकबाल को एथलीट प्रशिक्षण में लापरवाही और पीएएएफ के कुप्रबंधन को उजागर करने के बाद आजीवन प्रतिबंध का सामना करना पड़ा। नदीम के लिए समर्थन की कमी को उजागर करने से त्वरित प्रतिशोध हुआ और पाकिस्तान के खेलों में सच्चाई के परिणामों के बारे में चिंता बढ़ गई।