शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

FIFA World Cup 2022: अर्जेंटिनाने विजयानंतर एक मिनिटांचे मौन धरले; फ्रान्सच्या एमबाप्पेला उगाच डिवचले, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 12:49 IST

अर्जेंटिनाच्या संघाने विजयाचे सेलिब्रेशन करताना कालियन एमबाप्पेची खिल्ली उडवली. 

नवी दिल्ली : अर्जेंटिनाच्या संघाने 2022च्या फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि एकच जल्लोष केला. मात्र संघाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने विजयाचा आनंद साजरा करताना फ्रान्सच्या कालियन एमबाप्पेची खिल्ली उडवली. अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये फ्रान्सविरूद्धच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझ आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा करताना फान्सचा स्टार एमबाप्पेची खिल्ली उडवताना दिसला. मार्टिनेझचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर बरीच टीका होत आहे.

दरम्यान, 2022 विश्वचषक फायनलमध्ये फ्रान्सला पराभूत केल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये नाचत होते. यारम्यान सर्व खेळाडू मध्यभागी थांबतात आणि म्हणतात, "एक मिनिट शांतता… मग गोलरक्षक मार्टिनेझ ओरडतो 'एमबाप्पेसाठी', यानंतर खेळाडू पुन्हा एकदा जल्लोष सुरू करतात.  

फ्रान्सच्या एमबाप्पेची उडवली खिल्लीकतारमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून मार्टिनेझला अंतिम सामन्यानंतर 'गोल्डन ग्लोव्हज' देण्यात आला. शूटआऊटच्या विजयात उत्कृष्ट पेनल्टी सेव्हर म्हणून त्याने शानदार कामगिरी केली. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अर्जेंटिनाचा संघ ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करत आहे. या व्हिडीओमध्ये मार्टिनेझने सर्वांना थांबवून एमबाप्पेचे नाव घेऊन खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे. 

एमबाप्पेने रचला इतिहास खरं तर फायनलच्या सामन्यात दोन पेनल्टी वाचवणाऱ्या अर्जेंटिनाच्या एमिलियानो मार्टिनेझला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा 'गोल्डन ग्लोव्हज' पुरस्कार देण्यात आला. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओवरून त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. जगभरातील चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. 23 वर्षीय एमबाप्पेने हरल्यानंतरही आपल्या खेळाने लोकांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा 'गोल्डन बूट' पुरस्कारही एमबाप्पेने पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे फ्रान्सच्या एमबाप्पेने फायनलमध्ये गोलची हॅटट्रिक करून इतिहास रचला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाFranceफ्रान्सLionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉल