शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अर्जेंटिना हॉकीत प्रथमच अजिंक्य

By admin | Updated: August 19, 2016 23:01 IST

अर्जेंटिनाने रिओ आॅलिम्पिकच्या अटीतटीच्या फायनल लढतीत बेल्जियमचा ४-२ असा पराभव करीत आॅलिम्पिक इतिहासात प्रथमच हॉकीत सुवर्णपदक जिंकले.

अंतिम सामना : बेल्जियमवर ४-२ ने मातरिओ : अर्जेंटिनाने रिओ आॅलिम्पिकच्या अटीतटीच्या फायनल लढतीत बेल्जियमचा ४-२ असा पराभव करीत आॅलिम्पिक इतिहासात प्रथमच हॉकीत सुवर्णपदक जिंकले.रिओ आॅलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला फक्त भारताकडूनच पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर या संघाने शानदार कामगिरी करताना गत चॅम्पियन जर्मनीचे आव्हान ५-२ ने उद्ध्वस्त करताना अंतिम फेरीत धडक मारली होती, तर बेल्जियमने अंतिम फेरीत धडक मारण्याआधी जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील हॉलंड संघावर ३-१ अशी मात केली होती.याआधी अर्जेंटिनाचा संघ कधीही आॅलिम्पिकच्या उपांत्य फेरी अथवा अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. यावेळेस मात्र त्यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारतानाच सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला.गुरुवारी डिओडोरो सेंटरमध्ये झालेल्या सुवर्णपदक लढतीत बेल्जियमचा फॉरवर्ड तांगुय कोसिन याने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करीत आपल्या संघाचे गोलचे खाते उघडले. तथापि, बेल्जियमची ही आघाडी फार काळ टिकू शकली नाही आणि अर्जेंटिनाचा कर्णधार इबारा पेड्रोने शानदार गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. तीनच मिनिटांनंतर अर्जेंटिनाच्या इग्नेसियो ओर्टिजने आणखी एक गोल करीत ही आघाडी २-१ अशी केली. अर्जेंटिना संघ पहिल्या क्वॉर्टरपर्यंत २-१ ने आघाडीवर होता.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करताना ३-१ अशी आघाडी केली. हा गोल सामन्याच्या २१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा डिफेंडर पिलट गोंजालो याने केला. १-३ ने पिछाडीवर पडल्यानंतर बेल्जियमने तिसऱ्या क्वॉर्टरच्या ४४ व्या मिनिटाला गॉथियर बोकार्डच्या शानदार गोलच्या बळावर २-१ अशी आघाडी कमी केली.चौथ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांत रोमहर्षक लढत पाहायला मिळाली आणि दोन्ही संघाने गोल करण्याच्या अनेक वेळा संधी निर्माण केली; परंतु अखेर अर्जेंटिनाने बाजी मारली. त्यांचा फॉरवर्ड माजिली अगस्टिन याने सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना ५९ व्या मिनिटाला गोल करीत स्कोअर ४-२ असा केला आणि आपल्या संघाला आॅलिम्पिक इतिहासात हॉकीतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. बेल्जियमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कास्यपदकाच्या लढतीत जर्मनीने हॉलंडचा ४-३ असा पराभव करीत कास्यपदक जिंकले.