शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

तिरंदाज हरविंदर सिंगचा सुवर्णवेध; मोनूला रौप्य, मोहम्मद यासिरला कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 02:31 IST

तिरंदाज हरविंदरसिंग याने बुधवारी येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले.

जकार्ता : तिरंदाज हरविंदरसिंग याने बुधवारी येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले.मोनू घनघास याने पुरुषांच्या थाळीफेकीत (एफ११) रौप्य जिंकल्यानंतर मोहम्मद यासिर याला पुरुष गोळाफेक प्रकारात (एफ४६) कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. हरविंदरने (डब्ल्यू २/एसटी) गटाच्या फायनलमध्ये चीनच्या खेळाडूला ६-० ने हरवून सुवर्ण जिंकताच भारताची सुवर्णांची संख्या सात झाली.डब्ल्यू २ गटात ज्यांचे शरीर अपंग असते किंवा ज्यांच्या गुडघ्याच्या खालचे दोन्ही पाय निकामी झालेले असतात, ज्यामुळे त्यांना उभे होता येत नाही आणि व्हीलचेअरची गरज भासते, अशा खेळाडूंचा समावेश होतो. एसटी गटाच्या तिरंदाजांमध्ये मर्यादित अपंगत्व असल्याने ते व्हीलचेरविना नेम साधू शकतात.ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्डमध्ये मोनूने तिसऱ्या प्रयत्नांत ३५.८९ मीटर थाळीफेक करीत दुसरे स्थान मिळविले. इराणचा ओलाद माहदी ४२.३७ मीटरच्या नव्या विक्रमासह सुवर्णाचा मानकरी ठरला. गोळाफेकीत यासिरने १४.२२ मीटरसह कांस्य जिंकले. चीनचा वेई एनलोंग १५.६७ मीटरसह अव्वल स्थानी राहिला. कझाखस्तानच्या राविलला १४.६६ मीटरसह रौप्य मिळाले.टेबल टेनिस दुहेरीत टीटी-३-५ गटात भवानीबेन पटेल व सोनलबेन पटेल अंतिम फेरीत इंडोनेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांना रौप्यवर समाधान मानावे लागले.बुद्धिबळात भारताने एक रौप्य व दोन कांस्य पदके जिंकली. जेनिथा एंटोने महिलांच्या वैयक्तिक पी-१ गटात रौप्य जिंकल्यानंतर प्रेमा कनिश्रीसह सांघिक कांस्य जिंकले. याशिवाय मृणाली प्रकाश, मेघा चक्रवर्ती व तिजान पुनारम यांनीही बी-२- बी-३ प्रकारात कांस्य जिंकले. पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरने ८० किलो गटात १९२ किलो वजन उचलून तिसरे स्थान घेतले. (वृत्तसंस्था)पदकतालिकेत भारत नवव्या स्थानीभारताने बुधवारी एकूण नऊ पदके जिंकली. आतापर्यंत सात सुवर्ण, १३ रौप्य आणि १७ कांस्यसह एकूण ३७ पदकांसह भारत पदक तालिकेत नवव्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावर असलेल्या चीनने १०० सुवर्ण, ४७ रौप्य आणि ३९ कांस्य पदके जिंकली.

टॅग्स :Asian Para Games 2018आशियाई पॅरा स्पर्धा 2018