शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

आराश मेहता उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:25 IST

तब्बल ५ गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलच्या आराश मेहताने झुंजार खेळ करताना जिंदाल स्कूलच्या राहुल धाराचे कडवे आव्हान ३-२ असे मोडून आंतर शालेय

मुंबई : तब्बल ५ गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलच्या आराश मेहताने झुंजार खेळ करताना जिंदाल स्कूलच्या राहुल धाराचे कडवे आव्हान ३-२ असे मोडून आंतर शालेय स्क्वॉश स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. अन्य सामन्यात जिंदाल स्कूलच्याच अविनाश यादवने सहज बाजी मारताना उपांत्य फेरीत प्रवेश केला.‘स्पोटर््स फॉर आॅल’ अंतर्गत नेरूळ येथील डी.वाय. स्पोटर््स स्टेडियम येथे सुरू असलेल्या शालेय क्रीडा महोत्सवातील स्क्वॉशचा १५ वर्षांखालील मुलांचा उपांत्यपूर्व सामना चांगलाच रंगला. पहिले दोन गेम सहज जिंकून २-० अशी आघाडी घेतलेल्या आराशला यानंतर राहुलने जबरदस्त पुनरागमन करताना सलग दोन गेममध्ये बाजी मारून सामना निर्णायक पाचव्या गेममध्ये नेला. या वेळी पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करताना सामना अटीतटीचा केला. मात्र मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना आराशने राहुलवर दडपण टाकले आणि अंतिम गेमसह बाजी मारताना ११-९, ११-७, ९-११, ११-१३, ११-९ अशा गुणांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला रंगलेल्या अन्य उपांत्यपूर्व सामन्यात एकतर्फी खेळ झाला. अविनाश यादवने सुरुवातीपासून राखलेला आक्रमक धडाका अखेरपर्यंत टिकवून ठेवत वेदान्त अंबानीला सहज नमवले. वेदान्तला पुनरागमनाची कोणतीही संधी न देताना अविनाशने ११-३, ११-६, ११-८ अशा विजयासह दिमाखात उपांत्य फेरी गाठली.मुलांच्या १३ वर्षांखालील गटात आर्य विद्यामंदिरच्या आर्यमान जयसिंगनेदेखील झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना जिंदाल स्कूलच्या ओम जैसवालला पराभूत केले. पहिले दोन गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर आर्यमानने फिनिक्स भरारी घेताना सलग तीन गेम जिंकून ओमचे आव्हान ५-११, ९-११, ११-५, ११-७, ११-६ असे संपुष्टात आणले. या विजयासह आर्यमानने उपांत्य फेरी गाठली. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात आकाश गुप्ताने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात धमाकेदार विजय मिळवताना आदित्य चौहानचा ११-०, ११-०, ११-० असा चुराडा केला. (क्रीडा प्रतिनिधी)