शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

आशियाडसाठी ८०४ जणांच्या पथकाला मंजुरी, क्रीडा मंत्रालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 06:07 IST

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आयोजित १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ८०४ सदस्यांच्या भारतीय पथकास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली.

नवी दिल्ली - इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आयोजित १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ८०४ सदस्यांच्या भारतीय पथकास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली. त्यात ५७२ खेळाडूंचा समावेश असून ३१२ पुरुष तसेच २६० महिला आहेत. सरकार ७५५ लोकांचा खर्च करणार असून २३२ पैकी ४९ अधिकाऱ्यांना मात्र स्वखर्चाने अथवा संबंधित महासंघाच्या खर्चाने जावे लागेल.भारतीय आॅलिम्पिक संघटनेने सोमवारी शिफारस केलेल्या सर्वच नावांना मंत्रालयाने मंजुरी प्रदान करताना ही अट टाकली आहे. सरकार ५७२ खेळाडू, १८३ अधिकारी, ११९ कोचेस, २१ डॉक्टर आणि फिजिओ तसेच अन्य ४३ अधिकाºयांचा खर्च करणार आहे. खेळाडू ३६ क्रीडा प्रकारात भाग घेतील. ज्या ४९ जणांचा सरकार खर्च करणार नाही त्यात २६ संघ व्यवस्थापक, तीन कोचेस आािण २० अन्य अधिकाºयांचा समावेश आहे.क्रीडा मंत्रालयाने आयओएच्या १२ जणांना प्रवास करण्यास मंजुरी दिली असून त्यात पथकप्रमुख, चार उपप्रमुख तसेच सात अन्य सदस्यांचा समावेश आहे. दुसरीकडे आयओएने मात्र आमच्या १२ सदस्यीय पथकाचा खर्च करण्यास आम्ही सक्षम असल्याने सरकारच्या मदतीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. राजुकमार संचेती यांना उपपथकप्रमुख बनविल्यावरून वाद होताच आयओएने हा सावध पवित्रा घेतला आहे. क्रीडा मंत्रालयाने आयओएला लिहिलेल्या पत्रात ७५५ जणांचा खर्च सरकार करणार असून त्यात विमानप्रवास आणि व्हिसा खर्चाचाही समावेश आहे. अ‍ॅथलेटिक्स पथकातील ७ अधिकाºयांच्या खर्चास सरकारने नकार दिला. (वृत्तसंस्था)चार खासगी ट्रेनर खेळाडूंसोबत जाणार असले तरी त्यांना केवळ ‘पी’ कार्ड दिले जाईल. याचा अर्थ ते खेळाडूंच्या अथवा स्वत:च्या खर्चाने जातील. त्यात वेगवान धावपटू दूतीचंदचे कोच रमेशसिंग आणि ४०० मीटरचे कोच वसंतसिंग यांचा समावेश आहे. कुराश या खेळातील सहा अधिकाºयांना देखील पी गटात कार्ड देण्यात आले असून हॅन्डबॉलच्या दहापैकी पाच अधिकाºयांना स्वखर्चाने जावे लागेल.राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे आशियाडसाठी कुठल्याही खेळाडूचे आईवडील अतिरिक्त अधिकारी म्हणून संघासोबत जाणार नाहीत. बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांचे फिजिओ मात्र पथकात सहभागी असून त्यांचा खर्च सरकार करेल. नेमबाज हीना सिद्धूचे पती आणि कोच रौनक पंडित तसेच जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकरचे कोच बिश्वेश्वर नंदी हे देखील सरकारी खर्चाने प्रवास करतील.५७२ खेळाडू आणि ११९ कोचेसना दरदिवशी ५० डॉलर पॉकेटमनी देण्यात येणार आहे. याशिवाय २१ डॉक्टर आणि फिजिओना दरदिवशी २५ डॉलर दिले जातील.

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या