शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयला आणखी एक धक्का

By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST

रवींद्र जडेजाला डिवचल्याप्रकरणी इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अॅण्डरसन याच्याविरुद्ध गार्डन लुईस यांनी दिलेल्या निर्णयावर अपील करण्याची भारताची विनंती आयसीसीने फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली : रवींद्र जडेजाला डिवचल्याप्रकरणी इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अॅण्डरसन याच्याविरुद्ध गार्डन लुईस यांनी दिलेल्या निर्णयावर अपील करण्याची भारताची विनंती आयसीसीने फेटाळून लावली आहे.
बीसीसीआयने आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्ड्सन यांना मंगळवारी पत्र लिहून लुईस यांनी अॅण्डरसनबाबत दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणात केवळ रिचर्ड्सन हेच लुईस यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकले असते. आयसीसीचे नवे अध्यक्ष एन. श्रीनिवासन  हे मात्र या संपूर्ण प्रकरणात अलिप्त राहिले. प्रमुखपदी श्रीनिवासन असताना आयसीसीचे सीईओ रिचर्ड्सन यांनी अपील करण्याचा अधिकार असूनही नकार दिल्याने बीसीसीआयला धक्का बसला. अपील का केले नाही, याबद्दल स्वत:ची बाजू मांडताना रिचर्डसन म्हणाले, की शिस्तपालन प्रक्रियेचा भाग म्हणून मी अपील न करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आलेला लेखी निर्णय ग्राह्य मानण्यात आला. या निर्णयावर आयसीसी पूर्णपणो समाधानी आहे. 
अॅण्डरसन आणि जडेजा यांच्यातील वादाची चौकशी करणारे आयुक्त लुईस यांनी दोन्ही खेळाडूंना पुराव्याअभावी निदरेष ठरविले. पण, अॅण्डरसनला मोकळे सोडल्याबद्दल भारताने नाराजीचा सूर 
आळवला.  ट्रेंटब्रिज कसोटीदरम्यान जडेजाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यावरून अॅण्डरसनवर लेव्हल तीन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.  (वृत्तसंस्था)
रिचर्डसन पुढे म्हणाले, की तपास निष्पक्ष झाला. दोन्ही पक्षांना प्रश्न विचारणो आणि साक्षी नोंदविण्याची समान संधी देण्यात आली. बीसीसीआयच्या अपीलमध्ये कुठलेही तथ्य नसल्याची आमची भावना आहे. अपील करणो हे खेळ आणि खेळ भावनेविरुद्ध होईल. हा मुद्या संवेदनशील असून, दोन्ही खेळाडूंविरुद्ध आरोप आहेत. 
उभय पक्षांकडून परस्परांविरुद्ध 13 साक्षी नोंदविण्यात आल्या. लुईस यांनी दिलेल्या निर्णयावर आयसीसीने गंभीर विचार केला. लुईस हे अनुभवी आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हापुन्हा ताजे करणो योग्य ठरणार नाही.